मराठी

लघु, मध्यम उद्योगात पाच कोटी रोजगाराची क्षमता

नवी दिल्ली/दि.७  – केंद्रीय मंत्री गडकरी यांनी होरासिस आशियाच्या 2020 च्या बैठकीत हे सांगितले, आर्थिक विकासात लघु व मध्यम उद्योगाचे योगदान 30 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रात पाच कोटी रोजगार देण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे.
केवळ एमएसएमई क्षेत्रातूनच पाच कोटी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा सरकारचा विचार आहे. येत्या काही वर्षांत भारत जगातील अव्वल वाहन उत्पादन हब बनेल. चीनच्या तुलनेत भारताची वाढीची क्षमता अधिक आहे. आर्थिक विकासासाठी एमएसएमईचे योगदान वाढविणे हे सरकारचे उद्दीष्ट आहे. कच्च्या मालाची उपलब्धता, युवा मनुष्यबळ आणि केंद्र व राज्य सरकारची अनुकूल धोरणे यामुळे भारताला गुंतवणूकीसाठी प्राधान्य देणारे स्थान बनले आहे. एमएसएमईची निर्यात 48 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. कोरोना आजारामुळे होणा-या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक समस्यांना दूर करण्याबाबत चर्चा करण्यासाठी आशिया आणि जगातील 400 हून अधिक प्रख्यात राजकीय नेते आणि उद्योजक होरासीस एशिया बैठक 2020 मध्ये एकत्र आले होते.
होराकीसचे अध्यक्ष, फ्रँक-जर्गन रिचर होरासीसचे अध्यक्ष फ्रँक-जर्गन रिचर यांनी ही बैठक यशस्वी झाल्याचे सांगितले. यामध्ये व्हिएतनाम, भारत, फिलीपिन्स, थायलंड, इंडोनेशिया, हाँगकाँगचे मंत्री तसेच जगातील अनेक उद्योगांमधील अनेक प्रमुख उद्योजक उपस्थित होते. ते म्हणाले, की बैठकीत सहभागींनी सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या भावनेत सहकार्य करण्याचे मान्य केले. या महामारीच्या काळात आशियादेखील प्रगती करीत आहे आणि या काळात त्याची अर्थव्यवस्था अधिक टिकाऊ बनवित आहेत.

Related Articles

Back to top button