मराठी

चीनने अपहरण केलेले पाच भारतीय पुन्हा मायभूमीत

14 दिवस अलग ठेवण्यात आले आहे

इटानगर/दि. १२ – अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेल्या पाच भारतीय नागरिकांना चिनी सैन्याने भारतीय सैन्याच्या स्वाधीन केले. ते १२ दिवसांनी परत आले. हे  हस्तांतरण किबिधू सीमेवर झाले. आता त्यांना कोरोना प्रोटोकॉलअंतर्गत 14 दिवस अलग ठेवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जाईल.

हे पाच तरुण एक सप्टेंबर रोजी बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा शोध सुरू होता. सहा सप्टेंबर रोजी भारतीय सैन्याने हॉटलाईनद्वारे संपर्क साधला आणि त्यांच्याविषयी माहिती मागितली. आठ सप्टेंबर रोजी हॉटलाईनवर चीनने हे तरुण आपल्या सीमेवर असल्याची पुष्टी केली. मग भारताने या तरुणांना मुत्सद्दी व सैन्याच्या माध्यमातून चीनमधून परत आणण्याचा प्रयत्न सुरू केला. पाच जणांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते, की हे लोक मॅकमोहन रेषेवर म्हणजेच लॉन्ग रेंज रेकनोनिसन्स पेट्रोल LRRP) गस्त घालत असलेल्या कर्मचा-यांसाठी आवश्यक वस्तू घेऊन जात होते. द्वारपाल म्हणून त्यांचा पाळत ठेवण्यासाठी नेमलेल्या पथकात समावेश होता. त्यांचे वय 18 ते 20 वर्षांदरम्यान आहे. डोंगरातील पारंपारिक वनौषधी शोधत असताना ही तरुण मंडळी पहाटेपासून दूर भटकली असावीत, अशी भीती या कुटुंबाला होती.
पाच सप्टेंबर रोजी अरुणाचल काँग्रेसचे आमदार निनॉंग एरिंग यांनी ट्विटरवर पाच जणांना चिनी सैन्याने अपहरण केले, असा आरोप केला होता. मुलाची नावे टोक सिंगकम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू इबिया, तनु बेकर आणि नागरू दिरी असे होती. एरिंग म्हणाले होते, की नाचो शहरात राहणा-या पाच मुलांना चिनी सैनिकांनी पळवून नेले आहे. त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पाचही मुलांना सुखरुप परत आणावे, अशी मागणी केली होती. ही मुले टॅगिन समुदायाची आहेत. एरिंगच्या दाव्यानुसार, त्यांना नाचो प्रदेशातील जंगलातून चिनी सैन्याने उचलले. हा परिसर सुबानसिरी जिल्ह्यात येतो.

Related Articles

Back to top button