मराठी

पाच वर्षीय चिमुकलीला बिबट्याने नेले फरफटत

दुर्देवी घटनेत चिमुकली चा मृत्यू

चंद्रपुर/दि २७ – चंद्रपुर येथील एका वसाहतीत बिबट्याने प्रवेश करून पाच वर्षीय चिमुकलीला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास चंंद्रपुरातील उर्जा नगर वसाहतीत ही चिमुकली तिच्या आईसोबत फिरत असताना तिच्यावर बिबट्याने झडप घातली आणि तिला जंगलातील झुडपाकडे फरफटत नेले. चंद्रपूरच्या महाओष्णीक विद्युत केंद्राच्या वसाहतीत काल सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे भितीचे वातावरण आहे. बिबट्याच्या या हल्ल्यात लावण्या उमाशंकर धांडेकर (५) या मुलीचा मृत्यू झाला.उमाशंकर धांडेकर हे वीज केंद्रातील औद्योगिक सुरक्षा दलात कार्यरत आहे. सायंकाळी त्यांची मुलगी लावण्या वसाहतीत आईसोबत फिरत असताना तिथे बिबट आला व हल्ला केला. अंगाचा थरकाप उडविणारी ही
घटना उर्जानगर वस्तीला लागुन असलेल्या पर्यावरण चौकाजवळ घडली, लावंण्या उमाशंकर धांडेकर पाच वर्षाची चिमुकली आपल्या आई सोबत फिरायला निघाली असता रस्त्याच्या बाजुला असलेल्या झुडपात लपुन बसलेल्या बिबट्याने अचानक लावंण्यावर हल्ला केला व तिला उचलुन झुडपात नेले, यात लावण्या जखमी झाली.तिला शासकीय वेधकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले .वीज केंद्र वसाहतीत बिबट आल्याने दहशत व भीतीचे वातावरण आहे.

Related Articles

Back to top button