इंदूर/दि.२१ – मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारच्या मंत्री आणि भाजप नेत्या उषा ठाकूर या वादग्रस्त विधानासाठी वादात अडकल्या. देशातील सर्व मदरशांवर बंदी आणण्याची मागणी उषा ठाकूर यांनी केली. मदरशांच्या माध्यमातून मुलांना तिरस्काराचे धडे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘विद्याथ्र्यांना सामूहिक शिक्षण दिले जायला हवे. धर्म आधारित शिक्षण कट्टरतेचे धडे देत आहे. मदरशांमधून विद्वेष, तिरस्कार पसरवला जात आहे‘ असे ठाकूर म्हणाल्या. ‘जर तुम्ही या देशाचे नागरिक असाल तर पाहा… सगळा कट्टरतावाद, सगळे दहशतवादी मदरशांमधून वाढले आहेत. जम्मू – काश्मीरला दहशतवाद्यांची फॅक्टरी बनवले गेले. असे मदरसे, जे मुलांना राष्ट्रवादाशी, समाजाच्या मुख्य धारेशी जोडू शकत नाही त्यांना आपण सामूहिक शिक्षणाशी जोडून समाजाला प्रगतीपथावर एकसाथ घेऊन जाऊ शकतो‘ असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना ठाकूर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, की आसामने मदरशांवर बंदी आणून दाखवली आहे. राष्ट्रहितात जो कुणी बाधा आणेल, अशा सगळ्या गोष्टी राष्ट्रहितासाठी बंद करायला हव्यात. मदरशांना दिली जाणारी सरकारी मदतही बंद व्हायला हवी. ‘वक्फ बोर्ड‘ ही स्वत:च एक समर्थ संस्था आहे. कुणाला खासगी रित्या आपले धार्मिक संस्कार द्यायचे असतील, तर आपल्या संविधानाने ही सूट दिलेली आहे, असे म्हणतानाच मदरशांवर आणि तिथे दिल्या जाणाèया शिक्षणावर टिप्पणी करत भाजपच्या या मंत्र्यांनी यावर बंदी आणण्याच्या मताचा पुरस्कार केला.