मराठी

विमान अपघातातील जखमींना भेटण्यास मनाई

मृतात एक कोरोनाग्रस्त; कोझिकोड अपघातात १८ ठार

कोझिकोड दि . ८ – केरळच्या कोझिकोडमध्ये शुक्रवारी झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरा बसला. या अपघातात १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बातमी मिळाल्यानंतर या विमानातील प्रवाशांचे अनेक नातेवाइक टाळेबंदी काळातही इथे पोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत; परंतु येथे आल्यानंतरही जखमी प्रवाशांची भेट घेता येणार नाही. त्याचे कारण या अपघातातील एक मृत प्रवासी होता.

दरम्यान, उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी शनिवारी दुपारी घटनास्थळाला भेट दिली. या वेळी, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई, तर गंभीर जखमींना दोन लाखांची मदत तसेच किरकोळ जखमी व्यक्तींना ५० हजार रुपयांचा मदतनिधी देण्याची घोषणा त्यांनी केली. ‘एअरपोर्ट अथॉरिटी ऑफि इंडिया‘च्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान कोझिकोड विमानतळाजवळ रनवेपासून एक हजार मीटर अगोदरच टॅक्सी वेजवळ धडकले होते. करिपूर एअरपोर्टच्या पठारावर विमानाचे लँन्डिंग करताना ते घसरले आणि थेट दरीत कोसळले. या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले. या विमानातून पायलट आणि क्रू मेम्बरसहीत १९१ प्रवासी प्रवास करत होते. यातील एक मृत प्रवासी कोरोना बाधित असल्याचे उघड झाले. या घटनेतील १४९ जखमी प्रवाशांना मलप्पूरम आणि कोझिकोडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील २२ जणांची प्रकृती गंभीर आहे, तर २२ जणांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे .

मदतकार्यातील सर्वांची तपासणी

४५ वर्षीय मृत प्रवाशी सुधीर वायर्थ यांचे स्वॅबचे नमुने इतर मृत प्रवाशांच्या नमुन्यासोबत कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. यात ते होकारात्मक आढळले आहेत, अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्री के के शैलजा यांनी दिली. त्यामुळे आता विमानतळावर मदत कार्यात जोडल्या गेलेल्या सर्व लोकांना क्वारंटाईन केले जात आहे. त्यांचे नमुनेही कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button