मुंबई दि . ८ – कोरोना विषाणूमुळे आर्थिक आघाडीवर सतत नकारात्मक वृत्त येत असताना आता परकीय चलन साठ्याच्या बाबतीत मात्र चांगली बातमी मिळाली आहे. ३१जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा ५३४.५ ७ अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.
यापूर्वी भारताकडे एवढे परकीय चलन नव्हते. गुरुवारी चलनविषयक धोरणाची घोषणा करताना रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, की ५३४.६ अब्ज डॉलरचा परकीय चलनाचा साठा १३ महिन्यांच्या आयातीसाठी पुरेल एवढा आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३१ जुलैपर्यंत परकीय चलन साठा ५६. ८ अब्ज डॉलर्सने वाढला आहे. यापूर्वी २४ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा ४.९३ अब्ज डॉलरने वाढून ५२२.६३ अब्ज डॉलर्सवर आला होता. ५ जून रोजी संपलेल्या आठवड्यात प्रथमच देशातील परकीय चलन साठा ५०० अब्ज डॉलर्सच्या पातळीवर आला. परकीय चलन साठ्यात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे ३१ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात चलन साठ्यातील एक महत्त्वाचा भाग परकीय चलन मालमत्तेत वाढहे आहे. रिझव्र्ह बँकेच्या मते, विदेशी चलनाची मालमत्ताही १०.३५ अब्ज डॉलर्सने वाढून ४९०.८३ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. यामुळे आठवड्याभरात सोन्याचा साठा १.५३ अब्ज डॉलरने वाढून ३७.६३ अब्ज डॉलरवर गेला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील भारताचा राखीव निधी ५.४ कोटी डॉसर्सने वाढून ४.६४ अब्ज डॉलरवर पोचला आहे. याव्यतिरिक्त, जागतिक नाणेनिधीली भारताचे विशेष रेखांकन अधिकारही १.२ दशलक्ष डॉलर्सने वाढून १.४८ अब्ज डॉलरवर पोचले आहे.