मराठी
वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केली वॉटर कप मध्ये झालेल्या कामाची पाहणी
विदर्भातील पहिली गवताची नर्सरी गव्हाणकुंड येथे
मोर्शी तालुका प्रतिनिधी ९ – सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून वरुड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली वरुड तालुक्यातील नागरिकांनी श्रमदानाच्या माध्यमातून पूर्ण केली आणि वरुड तालुक्यातील काही गावे आदर्श ठरली त्या आदर्श गावातील अनेक सामाजिक समस्यांचा आणि गावकऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा मोर्शी येथील वन परिक्षेत्र अधिकारी आनंद सुरत्ने, जगदीश बलोदे वनपाल, रवींद्र आसोले वनरक्षक, विदर्भ मास्टर ट्रेनर सुमित गोरले, रुपेश वाळके यांनी वरुड तालुक्यातील गव्हाणकुंड येथील वॉटर कप स्पर्धेमध्ये झालेल्या कामाचा आढावा जाणून घेण्याचा प्रयत्न केला . देशातूनच नाही तर जगभरातून असंख्य लोक टीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमांतून पाणी फाउंडेशन सोबत जोडले गेले. त्यानुसार अनेकांनी कामेही सुरू केली होती. अनेक स्तरांवर लोकांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे बदल सुरू झाला, गोष्टी बदलू लागल्या. वरुड तालुक्यातील गव्हानकुंड येथील झालेल्या कामांमुळे कळत आहे की लोकांना परिवर्तन हवे आहे आणि त्यासाठी त्यांची काम करण्याची देखील इच्छा आहे हे वरुड तालुक्यातील गव्हानकुंड येथील नागरिकांनी दाखवून दिले आहे .
पाणी ही एक अशी समस्या आहे जी सगळीकडे दिसून येते. गाव असो की शहर, पाण्याची समस्या सर्वत्र सारखीच आहे. येणाऱ्या काही दिवसात काय परिस्थिती असेल याचा विचार देखील करवत नाही. खासकरून गावात, कारण जिथे पाणी नाही तिथे शेती नाही. पाण्या अभावी शेतीतील उत्पन्नात मोठ्या प्रमाणात तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो , पाणी टंचाईच्या या जीवघेण्या परिस्थितीला कंटाळून अनेकजण गाव सोडून शहराकडे जात असल्याचे पाहायला मिळत आहे .
त्यासाठी या सगळ्या गावांनी एकत्र येऊन आपल्या गावांमध्ये अत्यंत कमी खर्चात होणारे जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्राचे काम केले आहे . या कामाचा परिणाम म्हणजे त्यांच्या भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे . या गावांवर पडलेल्या पावसाचा एकही थेंब वाहून जात नाही . पावसाच्या पाण्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने साठवून अडवून ठेवले गेले आहे .हे काम प्रत्येक गाव, प्रत्येक शहरात करता येण्यासारखे आहे. प्रत्येक गाव हिरवेगार व समृद्ध होऊ शकते कारण हे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सोपे, शक्य आणि कमी खर्चात होणारे आहे .
पानी फाउंडेशनच्या माध्यमातून केवळ पाण्याच्या संकटाबाबत जनजागृतीच करत नाही तर ट्रेनिंगद्वारे तांत्रिक माहिती देऊन शेतकऱ्यांना सक्षम केले जात आहे . पाणी फाउंडेशन ला हा विश्वास आहे की पाण्याच्या या संकटावर मात करण्यासाठी लागणारी सगळ्यात मोठी ताकद लोकांच्याच हातात आहे. कारण जिथे जिथे ही समस्या सोडवली गेली तिथे तिथे लोकांच्या मेहनतीमुळे आणि प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले असल्याचे जिवंत उदाहरण वरुड तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे त्याचाच आढावा घेऊन असा प्रयोग मोर्शी तालुक्यामध्ये करून मोर्शी तालुका ड्राय झोन मुक्त करून मोर्शी तालुका पाणीदार करण्यासाठी पाणी फाउंडेशन मार्फत श्रमदानाच्या माध्यमातून झालेल्या कामाची पाहणी करून घेण्यासाठी मोर्शी येथील वन परिक्षेत्र अधिकारी आनंद सुरत्ने, रुपेश वाळके, सुमित गोरले मास्टर ट्रेनर पाणी फाऊंडेशन, नयन गावंडे ट्रेनर पाणी फाऊंडेशन, मनीष कवडे ट्रेनर, अर्जुन बिसंद्रे ट्रेनर, अक्षय सर्याम ट्रेनर, मुंगदाणे, तालुका समनव्यक आरती खडसे, जयकुमार सोनूले ट्रेनर, यांच्यासह आदी युवक मंडळी उपस्थित होती .
विदर्भातील पहिली गवताची नर्सरी गव्हानकुंड येथे
विदर्भात पहिल्यांदाच गवताची नर्सरी तयार करण्याचा प्रयोग गव्हानकुंड यथे करण्यात आला असून येथे ९ प्रकारच्या वेगवेगळ्या गवताची नर्सरी तयार करण्यात आली आहे .जणावरांच्या पौष्टिक चाऱ्याची निकड भरून निघावी यासाठी मागील वर्षी गव्हाणकुंड येथील युवकांनी १० गुंठेमध्ये ९ प्रकारच्या वेगवेगळ्या जातीच्या पौष्टिक गवताची लागवड करून ८ महिन्या दरम्यान नर्सरी मधून गवताची तीनदा कापणी केली होती. गवत बी व गवताची ठोंबे वाढल्याने ऐका रोपापासून २० पेक्षा जास्त रोप तयार झाली. लोकसहभागातुन यावर्षी ग्रामस्थांनी सरी पाडून, बेड्स तयार करून मोठ्या प्रमाणात गवताची लागवड केली आहे . या मध्ये प्रामुख्याने दशरथ ,पवना ,काळे अंजन, पांढरे अंजन, मारवेल , गिनी गवत ,डोंगरी गवत, ई. ही सर्व उत्तम पौष्टीक गवताची रोपे तयार करून लागवड करण्यात आली आहे .