मराठी

माजी राज्यपालांच्या मुलाला अटक

महिलेच्या आत्मदहनाचा प्रयत्न

लखनऊ/दि.१४ – लखनऊ विधानभवनाजवळ मंगळवारी आत्मदहनाचा प्रयत्न करणा-या अंजली तिवारीच्या प्रकरणाला राजकीय रंग आला आहे. लखनऊ पोलिसांनी रात्री उशिरा राजस्थानचे माजी राज्यपाल सुखदेव प्रसाद यांचा मुलगा आणि काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष आलोक प्रसाद यांना ताब्यात घेण्यात आले आहे. महाराजगंजच्या वीर बहादूर नगर मोहल्ला येथे राहणारे आलोक प्रसाद यांनी महिलेला आत्महत्या करण्यास उद्युक्त केल्याचा आरोप आहे. आलोक प्रसाद यांच्या अटकेनंतर महाराजगंजमध्ये राजकीय गोंधळ वाढला. त्यांना राजकीय विरोधात अडकवल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला. प्रसाद यांच्या अटकेची बातमी महाराजगंजपर्यंत पोहोचताच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अवनीश पाल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. काँग्रेसजणांनी जिल्हा मुख्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करून आपला विरोध दर्शविला. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक पाल यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षातील काही लोकांना वाचविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. प्रसादची सुटका केली नाही, तर काँग्रेसला तीव्र आंदोलन हाती घ्यावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. काँग्रेसजणांचा इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस वीरेंद्र चौधरी, पूर्णवासी प्रसाद आणि काँग्रेसचे इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Articles

Back to top button