मराठी

बायोटेक्नॉलॉजी माजी विभागप्रमुख डॉ. महेंद्रकुमार रॉय यांचा जागतिक नामवंत 2 दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश

विद्यापीठाच्या नावलौकिकात भर

अमरावती दि १२ – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाचे माजी विभागप्रमुख नॅनोटेक्नॉलॉजिस्ट यु.जी.सी. बी.एस.आर. फेलो डॉ. महेंद्रकुमार रॉय यांचा जगभरातील 2 टक्के नामांकित शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश झाला असून त्यांच्या जागतिक नावलौकिकाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.
स्टॅन्डफोर्ड विद्यापीठाने जगभरातील शास्त्रज्ञांची क्रमवारी जाहीर केली असून 2 टक्के जागतिक नामांकित शास्त्रज्ञांच्या यादीत आंतरराष्ट्रीय जर्नल पी.एल.ओ.एस. बायलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालामध्ये डॉ. रॉय यांचा समावेश केला आहे.  भारतीय व विदेशातील जर्नलसमध्ये त्यांचे चारशे संशोधन पेपर प्रकाशित झाले असून 22882 सायटेशन, 61 हायइंडेक्ससह 60 पुस्तके सुद्धा प्रकाशित झाली आहेत.  याशिवाय 102 पॉपुलर आर्टिकल त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत.
डॉ. रॉय यांना अनेक मानांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  त्यामध्ये अखिल भारतीय असोसिएशन फॉर क्रिश्चन हायर एज्युकेशनचा फादर टी.ए. मैथास अवार्ड, भारत सरकारचा मेदीनी अवार्ड यासह इतर नामांकित पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.
नॅनोटेक्नॉलॉजीवर त्यांचे भरीव संशोधन असून ब्रााझील, इटली यासह अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत.  स्वीझरलॅन्ड येथील जिनेव्हा विद्यापीठातील बायोएनर्जेटिकस विभागात व्हिजीटींग प्रोफेसर, हंगेरी विद्यापीठ, पोलंड येथील निकोलस कोपर्निकस विद्यापीठ यांसह अनेक देशांतील विद्यापीठांमध्ये त्यांनी व्हिजीटींग प्रोफेसर म्हणून कार्य केले आहे.‘नॅनोटेक्नॉलॉजीचा वनस्पतीवरील रोगांचे व्यवस्थापन’ या विषयावर त्यांचे संशोधन कार्य सध्या सुरु आहे.  दरवर्षी अद्रकाचे पिक बुरशीमुळे नष्ट होते.  डॉ. रॉय सध्या करीत असलेल्या संशोधनामुळे अद्रकाच्या पिकास पोषक वातावरण मिळून नाहीसे होण्यापासून पिकांचे संवर्धन होण्यास उपयुक्त ठरणार आहे.  भारतात सत्तर टक्के जनता शेतीवर अवलंबून असून त्यांच्या संशोधनाचा शेतक­यांना मोठ¬ा प्रमाणावर फायदा होणार आहे.
शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर शेतक­यांकडून केल्या जातो.  त्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होवून उत्पादनात दरवर्षी घट होत आहे.  शेतक­यांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढत असून नॅनोफर्टिलायझर खतामुळे कमी किंमतीत जमिनीची सुपिकता वाढून भरघोस पर्यावरणपुरक कृषि उत्पादन शेतक­यांना घेता येणार आहे.

Related Articles

Back to top button