मराठी

माजी मंत्री महादेव जानकर यांनी विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून दरवाढीची मागणी केली.

सरकारची अवस्था एका नव-याच्या दोन बायकांसारखीःप्रा. शिंदे

प्रतिदिन/दि.१

नगर: ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रत्यक्षात तिघाडी सरकार आहे. ‘एका नवऱ्याच्या दोन बायका’ अशी या सरकारची अवस्था आहे. याचा खेळ आवरत आलेला असून हे सरकार कधी कोसळेल, याचा पत्ताही लागणार नाही,’ अशी घणाघाती टीका माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.

दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी भाजपसह मित्र पक्षांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रा. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. माहीजळगाव येथे ‘रास्ता रोको’ करण्यात आला. त्यानंतर सरकारच्या विरोधात घोषणा देत सरकाररूपी दगडाला प्रतिकात्मक दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली.
‘दुधाचा दर कमी झालेला आहे. दुधाची खरेदी अतिशय कमी दराने होते आहे. विक्री मात्र ५० ते ६० रुपयांनी होते आहे. सरकारने यात मध्यस्थी करण्याची गरज होती. २१ ऑगस्टला आम्ही या संदर्भात निवेदनही दिले होते; मात्र त्यावर ना कुठली चर्चा झाली ना निर्णय. त्यामुळे आमच्यावर ही आंदोलनाची वेळ आली आहे,’ असे शिंदे म्हणाले. राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलेले आहे. शेतकरी रस्त्यावर आलेला आहे. दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. विजेची बिले अव्वाच्या सव्वा आली. युरिया मिळत नाही. कांद्याचा भाव कमी झाला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची मदत करताना सरकार दिसत नाही. त्यांना जनतेचे, शेतकऱ्यांचे काहीही घेणेदेणे नाही. गेल्या आठ महिन्यांत लोकांच्या हिताचा एकही निर्णय सरकारने घेतलेला नाही, अशी टीका करताना शिंदे यांनी सरकारचा निषेध केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button