मराठी

मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत कृषिपंप शेतकऱ्यांना दिलासा देण्यासह इतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमध्ये हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी ( आदरातिथ्य) परवान्यांची संख्या कमी करून ईझ ऑफ डुइंग बिझिनेसची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे

– ग्रामीण भागातील लाखो कुटुंबियांना दारिद्र्य रेषेवर आणणाऱ्या नव तेजस्विनी-महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाला गती देणार. 523 कोटी रुपये निधी उभारणार. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीमार्फत सहाय्य

– महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे कुलगुरु व प्र-कुलगुरु या वैधानिक पदावर नियुक्त अधिका-यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धर्तीवर ७ व्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय.

– कृषिपंप शेतकऱ्यांना दिलासा. उच्चदाब वितरण प्रणाली योजना राबविण्यासाठी एशिएन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय.

– हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी ( आदरातिथ्य) परवान्यांची संख्या कमी करून ईझ ऑफ डुइंग बिझिनेसची प्रभावी अंमलबजावणी

Back to top button