मराठी

कार-टँकरचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू

मृतकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाघ्यक्षांचा समावेश

बीड/दि.२६  –  बीड महामार्गावर कार आणि ऑइल टँकरचा भीषण अपघात झाला. या अपघात चार जणांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हा अध्यक्ष सदाशिव भिंगे व संतोष भिंगे यांचा समावेश आहे. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनसुर, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी औरंगाबादला जात असताना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक कार चालकाचा ताबा सुटल्याने कार विरुद्ध दिशेने येत असलेल्या एका ऑइल टँकरला धडकली दरम्यान या अपघातात घटनास्थळी जागीच दोन ठार तर उपचारादरम्यान दोघे मृत झाले. मृतांमध्ये सदाशिव भिंगे, संतोष भिंगे, महादेव सकटे, सुभाष भिंगे, राम भिंगे यांचा समावेश आहे. तर, राम भिंगे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
Back to top button