मराठी

निरुपयोगी टायर्समधून ती बनविते चपला, बूट!

मुंबई दि २४ – माहिती तंत्रज्ञान कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी तिनं सोडली. प्रदूषणामुळे ती अस्वस्थ होती. पर्यावरणाची तिला भलतीच चिंता. पूजा बार्मीकर हे तिचं नाव. निरुपयोगी टायर्समधून पादत्राणे बनवून प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचा संदेश देत पूजाने आपला व्यवसाय सुरू केला. तिची पादत्राणे आता लोकप्रिय होत आहे; शिवाय तिच्याकडून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जात आहे.
पूजाने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. गेली दोन वर्षे तिच्या फुटवेअर ब्रँड ‘निमितल’ अंतर्गत ती ऊर्जा बचतीचे आणि पुनर्वापराचे काम करीत आहे. पूजा सांगते, की टायर्समधून पादत्राणे बनविण्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. खराब टायर्सचे पुनर्चक्र आणि पादत्राणे बनविण्यासाठी पूजा बार्मीकर यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. पूजा म्हणाली, की जगभरात दरवर्षी सुमारे एक कोटी टायर फेकून दिले जातात. त्यामुळे प्रदूषण वाढते. जेव्हा मी हे संशोधन केले, तेव्हा मला या टायरमधून पादत्राणे बनवण्याची कल्पना आली. मी स्थानिक मोचीच्या मदतीने हे काम सुरू केले आणि दोन नमुने बनविले. यासाठी तिला महिला उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.  हे काम सुरू होण्यापूर्वी पूजा एका आयटी कंपनीत काम करत होती.
पूजा सांगते, की टायर्सपासून पादत्राणे बनविण्यामध्ये पर्यावरणाचे अनेक प्रकारे संरक्षण होते. अशा प्रकारे, बाजारात प्लॅस्टिकचा पुरवठा कमी केला जाऊ शकतो. पूजाच्या मते वाढते प्रदूषण आपल्या सर्वांसाठी हानिकारक आहे. ते कमी करण्यासाठी पुनर्वापर करणे ही एक आवश्यक पायरी आहे.

Related Articles

Back to top button