पेट्रोल, डिझेलबरोबरच गॅस भडकला
मुंबई/दि.१ – पेट्रोल आणि डीझेलच्या किमती वाढत असतानाच सामान्य नागरिकांच्या खिशाला आता गॅसनेसुद्धा कात्री लावली. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून गॅसच्या किमतींमध्ये25 रुपयांची वाढ केली आहे. दिल्लीत आता विनाअनुदानित सिलेंडर 819 रुपयांत मिळत आहे. आधी याची किंमत 794 रुपयेएवढी होती. 2021 मध्ये सुरुवातीच्या दोन महिन्यांतच घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्येतब्बल 125 रुपयांची वाढ झाली आहे. एक जानेवारी रोजी जेसिलेंडर 694 रुपयांना मिळत होते, तेआता 819 रुपयांवर पोहोचलेआहे.
फेब्रुवारी महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती तीनदा वाढवण्यात आल्या आहेत. सरकारनेचार फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये25 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी त्यात 50 रुपयांची आणि 25 फेब्रुवारी रोजी पुन्हा 25 रुपयांची वाढ केली. अर्थात एका महिन्यातच सिलेंडरचेभाव शंभर रुपयांनी वाढवण्यात आले. एक डिसेंबर 2020 रोजी गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपयांवरून 644 करण्यात आली. एक जानेवारी रोजी त्यात पुन्हा 50 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळेघरगुती स्वयंपाकाचेसिलेंडर 694 रुपयांत येत होते. मग फेब्रुवारी महिन्यात तीनदा एकूण शंभर रुपयेवाढवण्यात आले. अशा प्रकारे25 फेब्रुवारी रोजीच गॅस सिलेंडरची किंमत 794 रुपये झाली. आता एक मार्चपासून आणखी 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
19 किलोच्या वाणिक्षय वापराच्या सिलेंडरच्या किमतीसुद्धा 90.50 रुपयांनी महागल्या आहेत. दिल्लीत आता कमर्शिअल सिलेंडरची किंमत 1614 रुपये तर मुंबईत 1563.50 रुपये करण्यात आली आहे.