मराठी

सात वर्षांत गॅसच्या भावात दुप्पट वाढ

नवी दिल्ली/दि १० –  केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलेकी, गेल्या सात वर्षांत घरगुती एलपीजीची किंमत दुप्पट झाली आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रधान म्हणालेकी, एक मार्च2014 पर्यंत घरगुती गॅसच्या एका सिलिंडरची किंमत 410 रुपयेपन्नास पैसेहोती. सध्या त्याच सिलिंडरची किंमत 819 रुपयेआहे. गेल्या काही महिन्यांत देशांतर्गत अनुदानित एलपीजीच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. डिसेंबर 2020 मध्ये त्याची किंमत प्रति सिलेंडर किंमत 594 रुपयेहोती. त्याचप्रमाणेसार्वजनिक वितरण प्रणालीद्वारेगरिबांना केरोसीनची विक्री केली गेली, मार्च2014 मध्येसार्वजनिक वितरण प्रणालीत रॉकेल प्रतिलिटर 14.96 रुपयेहोते. या महिन्यात वाढून ते35 रुपये35 पैसेइतकेमहाग झालेआहे. त्याचबरोबर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दरही जास्त आहेत.
स्थानिक विक्री करा (व्हॅट) च्या आधारेदेशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल, डिझेलची किंमत वेगवेगळी असते. दिल्लीत सध्या पेट्रोल 91 रुपये17 पैसेआणि डिझेल 81 रुपये47 पैसे या भावानेविकले जात आहे. केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेत सांगितलेकी, पेट्रोलची किंमत बाजारात 26 जून 2010 पासून आणि डिझेलची किंमत 19 ऑक्टोबर 2014 पासून जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या दरानुसार निश्चित केली जाते. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती, डॉलरचा विनिमय दर, कर संरचना, आंतरराष्ट्रीय वाहतूक भाडेआदींच्या आधारेपेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर निर्णय घेतात. 2013मध्येइंधनावर वसूल केलेला कर 52 हजार 537 कोटी रुपयेहोता, जो2019-20 मध्येदोन लाख 13 हजार कोटी रुपयांवर गेला, असेही प्रधान म्हणाले. आर्थिक वर्ष2020-21 च्या 11 महिन्यांत कर वसुली 2.94 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.

Related Articles

Back to top button