मराठी

जीडीपीचे आकडे धोक्याचा इशारा देणारे डॉ. राजन यांचा इशारा

परिस्थिती हाताळता न आल्यास आणखी घसरण

मुंबई/दि ७ –  मोदी सरकार देशाच्या संथ अर्थव्यवस्थेबाबत विरोधकांच्या निशाण्यावर आहे.. रिझव्र्ह बँकेचे (RESERVE BANK OF INDIA)माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी परिस्थिती व्यवस्थित न हाताळल्यास भारतीय अर्थव्यवस्था आणखी घसरू शकते, असा इशारा सरकारला दिला आहे. २०२०-२१मधील पहिल्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी अर्थव्यवस्थेच्या विध्वंससाठी qचताजनक आहे. त्यामुळे सरकारने जीडीपीच्या आकडेवारीबाबत सतर्क असले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.. डॉ. राजन यांनी आपल्या qलक्डइन पेजवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे, की कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्था अमेरिका आणि इटलीपेक्षा जास्तच त्रस्त झाली आहे. या दोन्ही देशांमध्ये कोरोना विषाणूचा साथीचा रोग सर्वाधिक झाला आहे. अर्थव्यवस्थेत २३.९ टक्के घटीचे आकडे सरकारने जाहीर केले असले, तरी वस्तुस्थितीदर्शक आकडेवारी जेव्हा समोर येईल, तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आणखीच वाईट होईल.
म्हणजेच, अनौपचारिक क्षेत्राची आकडेवारी जोडल्यास, देशाची अर्थव्यवस्था -२३.९ पेक्षा अधिक घसरेल. सरकार प्रोत्साहन पॅकेजेस देण्यासाठी संसाधने वाचवण्याच्या धोरणाचे अनुसरण करीत आहे, ते अतिशय वाईट आहे. कोरोना नियंत्रित झाल्यानंतर मदत पॅकेज देण्याचा सरकारचा विचार करत आहे. तोपर्यंत थांबणे म्हणजे परिस्थिती हातातून जाण्यासारखे आहे. परिस्थितीचे गांभीर्य सरकारला नाही. तोपर्यंत अर्थव्यवस्थेचे खूप नुकसान होईल. संसाधने वाढवण्याची आणि शहाणपणाने खर्च करण्याची गरज आहे. जोपर्यंत देशात कोराना विषाणूवर नियंत्रण नाही, तोपर्यंत भारतात विवेकी खर्चाची परिस्थिती कमकुवत राहील, असे निदर्शनास आणून डॉ राजन म्हणाले, की सरकारने आतापर्यंत दिलेला दिलासा अपुरा आहे. तुम्ही एखाद्या रूग्णाप्रमाणे अर्थव्यवस्थेकडे पाहिले, तर त्यासाठी सतत उपचारांची आवश्यकता असते. मदत न मिळाल्यास लोक अन्नधान्यांवरचा खर्च कमी करतील. ते मुलांना शाळेतून घालवून देतील आणि त्यांना कामावर qकवा भीक मागण्यासाठी पाठवतील, कर्ज घेण्यासाठी त्यांचे सोने गहाण ठेवतील, ईएमआय आणि घरभाडे जाईल.

तर अर्थव्यवस्था उद्ध्वस्त् होईल

मदत मिळाली नाही, तर लहान आणि मध्यम कंपन्या (एमएसएमई) आपल्या कर्मचार्यांनना पगार देऊ शकणार नाहीत, त्यांचे कर्ज वाढेल आणि अखेरीस त्या बंद होतील. कोरोना नियंत्रणाची वाट पाहत बसले, तर अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल, असे निदर्शनास आणून त्यांनी सरकारला तातडीने मदत पॅकेजची देण्याची सूचना केली.

Related Articles

Back to top button