मराठी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न द्या गुरुदेव संघाची मागणी

गुरुदेव युवा संघ करणार मागणीसाठी अनोखे आंदोलन

अमरावती दि १७ – राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार साहित्य बहुआयामी व प्रेरणादायी आहे समाजाला मानवतेचा संदेश देणाऱ्या तुकडोजी महाराजांना केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न द्यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुदेव युवा संघाच्या वतीने नुकतेच देण्यात आले
तुकडोजी महाराज यांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण देत मानवतेचा संदेश दिला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य हे विश्वासाठी प्रेरणादायी आहे. त्यांची ‘ग्रामगीता’ ही ग्रामीण विकासाचा ज्ञानकोश आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत अशा महान संताला सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी गुरुदेव युवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भारतीय अस्मिता सांभाळत सर्वधर्मसमभावाचा संदेश जनमानसात रुजविला. अंधश्रद्धा, बुवाबाजी यांचा प्रखर विरोध करीत तीर्थक्षेत्राकडे न जाता जमीन कसून शेतीची कास धरावी, असे विचार ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून मांडत सर्वसामान्यांना जगण्याचे बळ दिले.
नव्या पिढीला जे माहीत नाही, ते देण्याचे काम अशा मानवतेचा व्यापक विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या लेखनातून पोहोचविल्याचे मनोज गेडाम यांनी सांगितले. तुकडोजी महाराज यांच्या ‘ग्रामगीते’ला ग्रामीण भागातील ज्ञानकोश म्हणून संबोधिले जाते.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर तुकडोजी महाराजांनी केला, त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते, तुकडोजी महाराजांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर हिंडून ते अध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले, जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला म्हणूनच अशा थोर पुरुषाला मरणोत्तर तरी भारतरत्न द्यावे अशा मागणीचे निवेदन गुरुदेव युवा संघाने जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे, लवकरच गुरुदेव युवा संघाच्या वतीने तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी मनोज गेडाम यांनी सांगितले

Related Articles

Back to top button