-
या घटनेने मंत्री जयंत पाटील यांना दु:ख…
मुंबई/दि. २९ – उत्तर प्रदेशच्या हथरस येथे महिलेवर झालेल्या गँगरेपबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुःख व्यक्त केले असून हे प्रकरण गंभीरतेने घेवून आरोपींना कडक शिक्षा द्या अशी मागणी जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.
जिथे गंगा, यमुना यांची संस्कृती वास करते… ज्या भूमीचं प्रतिनिधीत्व स्वर्गीय इंदिरा गांधी,स्वर्गीय राजीव गांधी,स्वर्गीय कांशीराम आणि अशा अनेक महान व्यक्तींनी केले त्या भूमीतून अशी खबर येते त्यावेळी मनाला फार दु:ख होते. या घटनेकडे गांभीर्याने पाहून आरोपींवर कारवाई करा असे मंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.