मराठी

सोन्याच्या आयातीत ५७ टक्के घट

मुंबई दि १८: सोन्याची आयात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच २०२०-२१ मध्ये 57 टक्क्यांनी घसरली. देशाच्या चालू खात्यातील तुटीत सोन्याची आयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. चालू खात्यातील तूट लक्षात घेता ही कपात चांगली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर २०२० या काळात देशाची सोन्याची आयात 6.8  अब्ज डाॅलरने घसरली. याचा अर्थ पन्नास हजार 568 कोटी रुपयांनी घटली.

देशाच्या सोन्याच्या आयातीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे कोरोना विषाणूच्या साथीमुळे मागणीतील घट हे आहे. विशेष म्हणजे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत देशाची सोन्याची आयात १५.8 अब्ज अब्ज डॉलर किंवा एक लाख दहा हजार २५9 कोटी रुपयांची होती. देशाच्या सोन्याच्या आयातीप्रमाणेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतही चांदीच्या आयातीत घट झाली. एप्रिल ते सप्टेंबर २०२० या काळात चांदीच्या आयातीमध्ये 63.4 टक्क्यांनी घट झाली. या कालावधीत चांदीची आयात घटून 73.35 कोटी डाॅलर किंवा पाच हजार 543 कोटी रुपये झाली.
देशातील सोन्या-चांदीच्या आयातीतील घटातील सर्वांत मोठा फायदा म्हणजे यामुळे देशातील चालू खात्यातील तूट कमी झाली आहे. चालू खात्यातील तूट म्हणजे आयात आणि निर्यातीमधील फरक. एप्रिल ते सप्टेंबर २०२० या कालावधीत देशातील चालू खात्यातील तूट २3.44 अब्ज डॉलरवर आली आहे. गेल्या वर्षी याच काळात ती 88.92 अब्ज डॉलर्स होती.

भारत हा जगातील सर्वांत मोठ्या सोन्याच्या आयातदारांपैकी एक आहे. भारतात सोन्याची आयात प्रामुख्याने दागदागिने उद्योगाच्या मागणीसाठी असते. भारत दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (२०२०-२१) रत्ने व दागिन्यांची निर्यातही कमी झाली आहे. या काळात तो 55 टक्क्यांनी घसरून 8.7 अब्ज डॉलरवर आली आहे.

Related Articles

Back to top button