मराठी

चांगले स्वास्थ हि जीवनाचे सर्वोत्तम वरदान आहे

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात जेष्ठ पञकार गिरिधर देशमुख यांचे व्याख्यानाचा  पोष्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योगा थेरपीच्या विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

अमरावती दि १४ – चांगले स्वास्थ हि जीवनाचे सर्वोत्तम वरदान आहे चांगल्या स्वास्थाकरीता योगयुक्त जीवनपद्धती महत्वाची आहेच
योग प्राणायाम हि
श्रुषीमुनींचे मनुष्याला मिळालेले वरदानच आहेअसे दॆनिक कॅलिफोर्निया टाईम्सचे मुख्य संपादक गिरिधर देशमुख यांनी आपल्या व्याख्यानात नमूद केले
 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या डिपार्टमेंट आॅफ लाईफलाॅंग लर्निग एक्सस्टेंशनच्या  पोष्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योगा थेरपी, या विषयावर ,दॆनिक कॅलिफोर्निया टाईम्सचे मुख्य संपादक गिरिधर देशमुख यांच्या व्याख्यानाचा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या डिपार्टमेंट आॅफ लाईफलाॅंग लर्निग एक्सस्टेंशनचे संचालक डा श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या डिपार्टमेंट आॅफ लाईफलाॅंग लर्निग एक्सस्टेंशन  विषयाच्या  समन्वयिका   प्रा शुभांगीताई रवाळे यांनी केले कार्यक्रमासाठी प्रा स्वप्निल मोरे,प्रा स्वप्निल इखार,प्रा अश्विनी टाले, यांनी परिश्रम घेतले
यावेळी आॅफ लाईन व आॅनलाईन विद्यार्थ्यांनी पञकार व योगगुरु  गिरिधर देशमुख यांच्या व्याख्यानाचा लाभ घेतला
यावेळी देशमुख यांनी योगसाधना, ध्यानधारणा, आसन व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले
गायञी महामंञातच प्राणायामाचे रहस्य दडले असुन गायञी मंञाच्या माध्यमातून वॆचारीक क्रांती सहज होते असे पञकार व योगगुरु गिरिधर  देशमुख म्हणाले
शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आले आभार प्रदर्शन स्वप्निल  मोरे यांनी केले

Related Articles

Back to top button