मराठी

गूड न्यूजः मुंबईतील घरांचे भाडे कमी

कोरोनामुळे घरांच्या किंमती कमी

मुंबई/दि.८ – मुंबईत घरांच्या किंमती कोरोनामुळे कमी झाल्या असताना आता घर भाडयाने घेणेही स्वस्त झाले आहे. शहरातील घरभाडे ३० टक्क्यांनी खाली आले आहे. परवडणा-या घरांची भाडी २०-३० टक्के कमी झाली आहेत. मध्यम-सेगमेंट घरांच्या भाड्यातही २२ ते २७ टक्क्यांनी घट झाली आहे. श्रीमंती, पॉश एरियात भाडयाने घर घ्यायचे असेल, तर भाडे १८ ते २५ टक्क्यांनी कमी झाले आहे. शहरात मोकळ्या घरांची संख्या वाढली आहे आणि ती खरेदी करण्यास सध्या फारसे ग्राहक नाहीत. मुंबईत परवडणा-या घराचे भाडे ४० हजार रुपयांपर्यंत आहे. त्यात २०-३० टक्क्यांनी घट झाली आहे. त्याच वेळी, मध्यम विभागाचे भाडे ४०-७० हजार रुपये आहे. त्यात २०-२५ टक्क्यांनी घट झाली आहे.
मुंबईतील लक्झरी विभागात भाडे ७० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आहे. त्यात १८-२५ टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबईतील बहुतेक भाडेकरू इतर शहरांमधून येथे व्यवसाय, कामासाठी येतात. बरेच विद्यार्थी येथे अभ्यासासाठी भाड्याने घरे घेतात. सध्या सर्व महाविद्यालये बंद आहेत. त्यातच ब-याच कार्यालयांचे काम घरून चालते. ब-याच लोकांना वेतन-कपात आणि नोकरी गमवावी लागली आहे. अशा परिस्थितीत बरेच लोक आपल्या मूळ गावी गेले आहेत. त्यामळेही घरे पडून आहेत. त्याचा परिणाम भाडे कमी होण्यात झाला आहे. मुंबईत घर भाड्याने देणे हे ब-याच लोकांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे बदललेल्या परिस्थितीचा विचार करून सदनिका मालकांनी भाडे कमी करण्याची तयारी दाखविली आहे.

Related Articles

Back to top button