मराठी

खासगी रुग्णालयांवर आता सरकारी वॉच!

भरारी पथकांची नियुक्ती, तीन दिवसांत मागविला अहवाल

मुंबई/दि. ७ – राज्य सरकारने खासगी रुग्णालयांना रुग्णांची लूट न करण्याचा तसेच अडवणूक न करण्याबाबत वारंवार बजावूनही खासगी रुग्णालयांचा मनमानी कारभार सुरूच आहे. त्यामुळे आता या मनमानीला चाप लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या निर्देशांची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथके नेमण्यात आली आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले असून तपासणी अहवाल तीन दिवसांत शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी राज्य शासनाने २१ मे २०२० रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे खासगी रुग्णालयांना कमाल दर मर्यादा निश्चित करून दिली आहे.

त्याचबरोबर कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय २३ मे रोजी घेण्यात आला असून ३० जून २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार खासगी वाहने आणि रुग्णवाहिका अधिग्रहीत करून त्यांचे कमाल दर निश्चित केले आहेत. खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देणे व त्याच्या अधिसूचनेच्या प्रभावी अमंलबजावणीचेही निर्देश देण्यात आले आहेत; परंतु खासगी रुग्णालयांकडून जादा शुल्क घेण्यात येत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांकडून जास्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन राज्याच्या जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी आणि काटोकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी तसेच विभागीय आयुक्तांनीदेखील त्यांच्या स्तरावर भरारी पथक नेमण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. वेळोवेळी जाहीर केलेल्या शासन निर्णयाचे खासगी रुग्णालयांकडून पालन होत आहे, की नाही याची खातरजमा या भरारी पथकांमार्फत करण्यात येईल. आकारलेले दर, खासगी वाहने, रुग्णवाहिका यांच्याकडून आकारले जाणारे दर योग्य आहेत, की नाही याची तपासणी करण्याची जबाबदारी भरारी पथकांवर आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांत दाखल होणाèया रुग्णांना कॅशलेस सुविधा दिली जाते, की नाही, या सर्व बाबींची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

बील तपासणारी यंत्रणा नेमण्याचे आदेश

खासगी रुग्णालयांमध्ये अधिसूचना व अधिसूचित दर दर्शनी भागावर लावले आहेत, की नाहीत याची पाहणी केली जाईल. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारी बिले अंतिम करण्यापूर्वी त्याच्या तपासणीसाठी यंत्रणा नेमण्याचे आदेश टोपे यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button