मुख्यमंत्र्यांसोबतच्या व्यासपीठावर येण्याचे टाळून राज्यपालांची नाराजी
मुंबई/दि.२१ – कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर राज्यभरातील धार्मिक स्थळे बंद आहेत. ही खुली करण्यावरून राजकारण तापले. यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वाद रंगला. आता यावरूनच राज्यपाल नाराज आहेत. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांसोबत एकाच व्यासपीठावर हजर राहणे टाळले आहे. पोलिस स्मृती दिन २०२० च्या कार्यक्रमाला ते गैरहजर राहिले. मुंबईत असलेल्या पोलिस स्मृती दिन कार्यक्रमाला राज्यपाल गैरहजर राहिले. नायगाव पोलिस मुख्यालयात ‘पोलिस स्मृती दिन‘ मानवंदना कवायत आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक हजर होते. मंदिरे उघडण्याच्या मुद्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पत्र व्यवहार झाला होता. यानंतर दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. यानंतर राज्यपाल नाराज असल्याचे दिसत आहे. राजशिष्टाचारानुसार राज्यपालांनी या कार्यक्रमाला हजर राहणे अपेक्षित होते; मात्र त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांवर अजूनही नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कोश्यारी यांनी ठाकरे यांना पत्र पाठवत qहदुत्वावावरुन डिवचले होते. आता यावर ठाकरे यांनीही उत्तर दिले. माझ्या qहदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे म्हणत त्यांनी खोचक शब्दांमध्ये त्यांना प्रत्युत्तर दिले होते.