हिरव्या मिरचीचे भाव गडगडले : शेतकरी चिंतातूर
७ हजारांवर गेलेली मिरची झाली १ हजार ५०० रुपये क्विंटल
वरुड दि २७ – ७ हजार, ५ हजार, ३ हजार, २ हजार अन आता पंधराशे हिरव्या मिरचीच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने मिरची उत्पदक शेतक:यांमध्ये चिंतेचे सावंट आहे. अन बाजार फुलण्याच्या वेळीच भाव घसरल्याने तिखट मिरची फिकी पडल्याची भावना मिरची उत्पदक शेतक:यांमध्ये दिसून येते.
सप्टेंबर पासून सुरु होणारा राजुरा बाजार येथील हिरवी मिरचीचा बाजार हिवाळ्याच्या मध्यात नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात जोमात फुलतो. मिरची पिकासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने मिरचीचे अधिक उत्पादन होते. अशावेळी चांगले बाजारभाव मिळावे, अशी अपेक्षा असतांनाच आता मिरची गडगडली. सुरवातीला पाच साडेपाच हजारापासून सुरुवात झालेले मिरचीचे बाजारभाव ७ हजारापर्यंत पोहचले. उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने शेतकरी सुखावला असतांनाच हिरव्या मिरचीचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली. ७ हजारी मिरची ५, ३, २ व आता १५०० वर आली. हिरव्या मिरचीचे बाजारभाव गडगडल्याने शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाला आहे. मिरचीचा उचांकी बाजारभाव कायम राहील म्हणून शेतक:यांनी महागडी किटकनाशके, रासायनिक खते व मशागतीवर भर देत अधिकचा खर्च केला; मात्र आता अल्प बाजारभाव शेतक:यांच्या चिंतेचे कारण बनल्याचे दिसून येते.