मराठी

मेघालयात हिरव्या रंगाचा चमकणारा मशरूम

शिलाँग दि २४- मेघालयात एक खास प्रकारची मशरूम प्रजाती आढळली आहे. हे मशरूम तेजस्वी हिरव्या प्रकाशाने चमकत आहेत. मशरूमच्या या प्रजातीचे नाव रोरीडोमायसेस फायलास्टायडस आहे. या भागात मशरूमच्या इतर 600 प्रजातीदेखील सापडत आहेत.
मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील धबधब्याजवळ हिरव्या प्रकाशाचा मशरूम प्रथम दिसला. त्यानंतर, ते पश्चिम जेंटिया हिल्स जिल्ह्यात आढळले. याला सामान्य भाषेत बायोल्युमिनसेंट म्हणतात. तज्ज्ञांच्या मते आतापर्यंत जगभरात अशा चमकणा-या बायोल्युमिनसेंट मशरूमच्या 97 प्रजाती आहेत. काही प्राणी, वनस्पती, जीवाणू आणि मशरूम असे प्रकाश पसरविणारे आहेत, असे चिनी अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या मायकोलॉजिस्ट सामन्था करुणार्थना म्हणतात. ते सहसा समुद्रात आढळतात; परंतु काही जमिनीवर आढळतात. हे जीव किती प्रकाश पसरतील हे त्यांच्यातील रासायनिक गोष्टींवर अवलंबून असते. एक विशेष सजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य ल्युक्रिफिर्स आहे. ऑक्सिजनमध्ये मिसळल्यास हिरवा रंग बनतो. जेव्हा मशरूममध्ये अतिरिक्त ऊर्जा असते, तेव्हा ते हिरवे दिव्यासारखे चमकतात.
मशरूमची ही प्रजाती बांबूच्या झाडाभोवती वाढते. ईशान्येकडील चार राज्यांमध्ये मशरूमच्या विविध प्रजातींचा शोध घेण्यासाठी हा प्रकल्प सुरू झाला. यात मेघालय, आसाम, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशचा समावेश आहे. या प्रकल्पाची सुरुवात बालीपुरा फाउंडेशनने कुंमिंग इन्स्टिट्यूट ऑफ बॉटनी आणि चिनी विज्ञान अकादमीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. 15 वर्षांपासून मशरूमवर काम करणारा या प्रकल्पाशी संबंधित फोटोग्राफर स्टीफन फॉक्सक्सफोर्ड म्हणतो, की आम्ही जिथे जिथे मशरूमसाठी माहिती गोळा करायला जातो, तेथे लोकांना चमकणाया मशरूमबद्दल आम्ही नक्कीच विचारतो. मशरूम आणि जनुकांच्या अनु क्रमांकाच्या तपासणीमुळे रोरीडोमीसेस कुटुंबातील असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले.

 

Related Articles

Back to top button