मराठी

नीट परिक्षेत उत्‍तीर्ण झालेल्‍या विद्यार्थींनीचा सत्‍कार

अमरावती/दि.२२  – झोन क्रमांक 1 रामपुरी कॅम्‍प अंतर्गत कृष्‍णा नगर गल्‍ली नं.2 येथील विद्यार्थीनी कु.आंचल अनिलकुमार पमनानी हिने नीटपरिक्षेत 720 पैकी 630 गुण प्राप्‍त केले. या विद्यार्थ्‍यांनींनी आत्मविश्वासाच्या बळावर मोठे यश संपादन केले. अमरावती महानगरपालिका महापौर चेतन गावंडे यांनी तिच्‍या घरी जाऊन सत्‍कार केला. तसेच चांगल्‍या गुणानी उत्‍तीर्ण झालेल्‍या या विद्यार्थीनीचे शैक्षणिक मनोबल वाढावा याकरिता पुष्‍पगुच्‍छ देवुन विद्यार्थीनीला उज्‍वल भविष्‍याकरिता मनःपुर्वक शुभेच्‍छा दिल्‍या व विद्यार्थीनीचे आई सौ.संगिता अनिलकुमार पमनानी व वडील श्री. अनिलकुमार ठाकुरदास पमनानी यांचे सुध्‍दा यावेळी अभिनंदन केले. यावेळी सभागृह नेता सुनिल काळे, विधी समिती सभापती प्रणित सोनी, नगरसेवक राजेश साहु, शंकर पमनानी विश्‍व हिंदु परिषद, गोपीचंद पमनानी, कशिश पमनानी, पलक पमनानी, ध्रुव पमनानी, दिशा पमनानी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button