मराठी

जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांहून अधिक

नवीदिल्ली/दि.१  – अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर 2019 मध्ये जीएसटी संकलन 95 हजार 379 कोटी रुपये होते. कोरोनानंतर फेब्रुवारीनंतर एक लाख कोटी रुपयांहून अधिक जीएसटी संकलन झाले. त्यानंतर आता प्रथमच एक लाख पाच हजार कोटी रुपयांहून अधिक संकलन झाले आहे. गेल्या एक वर्षापूर्वीच्या याच कालावधीपेक्षा या वेळी दहा टक्क्यांहून जास्त जीएसटी संकलन झाले.
कोरोनामुळे संकटात आलेली भारतीय अर्थव्यवस्था अनलाॅकनंतर आता सुधारत आहे. त्याचे ताजे संकेत वस्तू व सेवा कर संकलनाचे आहेत. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन एक लाख पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारीनंतर प्रथमच जीएसटी संकलनाची आकडेवारी एक लाख कोटींच्या पुढे गेली आहे. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत एकूण 80 लाख जीएसटीआर -3 बी रिटर्न भरले गेले आहेत. यामुळे ऑक्टोबर -2020 च्या जीएसटीचे महसूल संकलन एक लाख पाच हजार 155 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यात 19 हजार 193 कोटी रुपयांचे सीजीएसटी, पच हजार 411 कोटी रुपयांचे एसजीएसटी आणि 52 हजार 540 कोटी रुपयांच्या आयजीएसटीचा समावेश आहे. याखेरीज सेसद्वारे आठ हजार 11 रुपये मिळाले आहेत. आयजीएसटीमध्ये आयात केलेल्या वस्तूंमधून जप्त करण्यात आलेल्या 23 हजार 375 कोटी रुपयांचा समावेश आहे.

Back to top button