मराठी

शासकीय तूर खरेदीचा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

अमरावती, दि. २५: तिवसा उत्पन्न बाजार समिती येथे आज शासकीय तूर खरेदीचा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ६ हजार रुपये शासकीय तूर खरेदीचा हमी भाव तूर विक्रीसाठी आणनाऱ्या शेतकऱ्यासाठी निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती तिवसा खरेदी विक्री केंद्राचे व्यवस्थापक यांनी दिली. कोरोनाकाळात शेती क्षेत्रापुढे अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करत महाविकास आघाडी शासनाने शेतकरी हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. गत १० वर्षात झाली नाही एवढी विक्रमी कापूस खरेदी झाली. तूर खरेदीलाही आरंभ झाला आहे. अधिकाधिक तूर खरेदी उत्पादक शेतकरी बांधवांचा या प्रक्रियेत समावेश व्हावा व कुणीही वंचित राहू नये म्हणून पुरेपूर प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.
Back to top button