मराठी

पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांचा दौरा

अमरावती, दि. 19 : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर उद्या (20 नोव्हेंबर) जिल्हा दौ-यावर आहेत.त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता अमरावती निवासस्थान येथून कापूसतळणीकडे प्रयाण, सकाळी 11.45 वाजता कापूसतळणी येथे आगमन व सांत्वनपर भेट, दुपारी 12.15 वाजता गुरूदेवनगर मोझरीकडे प्रयाण, दुपारी 12.45 वाजता गुरुदेवनगर मोझरी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत चर्चा, दुपारी 2.30 वाजता ममदापूरकडे प्रयाण, दुपारी 3 वाजता ममदापूरला आगमन व सांत्वनपर भेट, दुपारी 3.30 वाजता धामंत्रीकडे प्रयाण, दुपारी 4 वाजता धामंत्रीला नागेश्वर महादेव संस्थानला भेट, दुपारी 5 वाजता कौंडण्यपूरकडे प्रयाण, दुपारी 5.30 वाजता कौंडण्यपूरला आगमन व सांत्वनपर भेट, सायंकाळी 6 वाजता कौंडण्यपूर शंकराचार्य मंदिर, जगतगुरू रामेश्वर महाराज मठ भेट व दर्शन, सायंकाळी 7 वाजता अमरावतीकडे प्रयाण, सायंकाळी 7.45 वाजता अमरावती निवासस्थान येथे आगमन व राखीव.

Related Articles

Back to top button