मराठी

पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम

अमरावती, दि. 13 : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत उद्या (14 ऑगस्ट) विविध कार्यक्रम होणार आहेत.
दौ-यानुसार, पालकमंत्री महोदयांचे शुक्रवारी (14 ऑगस्ट) सकाळी 10.15 वाजता निवासस्थान येथून स्व. सोमेश्वर पुसतकर यांच्या निवासस्थानी प्रयाण होईल. सकाळी 10.30 वाजता स्व. सोमेश्वर पुसतकर यांच्या निवासस्थानी आगमन व सांत्वनपर भेट, सकाळी 10.45 वाजता व्हिजन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रयाण, सकाळी 11 वाजता व्हिजन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलचे उद्घाटन, सकाळी 11. 15 वाजता श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयासाठी प्रयाण, सकाळी 11.30 वाजता श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात रानभाजी महोत्सवाला उपस्थिती, दुपारी 1 वाजता अमरावती निवासस्थानाकडे प्रयाण, दुपारी 1.10 वाजता निवासस्थानी आगमन व राखीव, दुपारी 2. 30 वाजता Standup against Violence for survivor centric services on violence against women करिता आयोजित वेबिनारद्वारे उपस्थिती, दुपारी 3 वाजता अमरावती येथून सालोरा (आमला) कडे प्रयाण, दुपारी 3. 30 वाजता सालोरा (आमला) येथे आगमन व पुरामध्ये वाहून नागरिकांच्या घरी सांत्वनपर भेट, दुपारी 4 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावतीकडे प्रयाण, दुपारी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन व पंतप्रधान/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेबाबत कार्यकारी अभियंत्यासमवेत चर्चा व आढावा, सायं. 5 वाजता शासकीय विश्रामगृह येथे अभ्यागतांच्या भेटी, सायं. 5.30 वा. अमरावती निवासस्थानाकडे प्रयाण, सायंकाळी 5.35 वाजता निवासस्थानी आगमन व राखीव.

शनिवारी (15 ऑगस्ट) सकाळी 8. 55 वाजता निवासस्थानावरून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रयाण, सकाळी 9 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आगमन, सकाळी 9.05 वाजता स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 10 वाजता निवासस्थानी आगमन व राखीव.

Related Articles

Back to top button