नांदगांव पेठ/दि २-हरियाणा मधील फरिदाबाद जिल्ह्यातील वल्लभगढ येथे परीक्षेवरून परतणाऱ्या निकिता तोमर नामक विद्यार्थिनीवर गोळी झाडून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने देशभर संतापाची लाट पसरली आहे.घटनेची व्हिडीओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाली असून घटनेतील मुख्य आरोपी स्पष्ट दिसत असतांना शासनाने आरोपीला भरचौकात फाशी द्यावी किंवा एन्काऊंटर करावा अशी मागणी बजरंग दल विभाग संयोजक संतोषसिंह उर्फ बाबू गहरवार यांनी केली आहे.
निकिता तोमर या विद्यार्थिनीवर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला असून लव्ह जिहाद च्या माध्यमातून ही घटना घडली आहे.स्थानिक पोलीस प्रशासनाने देशातील नागरिकांच्या भावनांचा विचार करून तसेच भविष्यात असे दुष्कृत्य करण्याची हिंमत कोणी करू नये यासाठी त्या नराधमास भरचौकात फाशी द्यावी किंवा एन्काऊंटर करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
बजरंग दल विहिप चे विभाग संयोजक संतोषसिंह उर्फ बाबू गहरवार यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला घटनेला जबाबदार असलेल्या सर्वांची कसून चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.यासंदर्भात सरकारला कोणतीही मदत लागल्यास विश्व हिंदू परिषद व बजरंग दल सहकार्य करण्यास तयार असल्याचेही संतोषसिंह गहरवार यांनी म्हटले आहे.