मराठी

विविध मागण्यांसाठी १४ पासुन आमरण उपोषणाला बसणार

काँग्रेसचे नगरसेवक धनंजय बोकडे यांचा जिल्हाधिका:यांना इशारा

वरुड  ४ सप्टेंबर – नागरी समस्या व न.प. प्रशासनाची असंवेदशील उपाययोजना न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा काँग्रेसचे नगरसेवक धनंजय बोकडे यांनी मुख्याधिका:यांमार्फत जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिका:यांना पाठविलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, वरुड शहरात अनेक समस्या आ-वासुन उभ्या आहेत. प्रशासन फक्त मुकदर्शक बनुन बघ्यांची भुमिका घेत आहेे. चौपट कर वसुल करणारी नगरपालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेे. समस्यांकरिता अनेक निवेदन व आंदोलन झाली पण तोडगा निघाला नाही. नाईलाजाने आम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ आली आहेे. ज्या नागरिकांकडुन कर वसुली करता त्यांनाच जर उपोषण करुन आपले हक्क मिळवावे लागत असतील तर याला लोकशाही व रामराज्य म्हणता येईल काय?
प्रशासन पुर्णत: अर्थपुर्ण कार्यातच सक्रीय दिसत असुन नागरिकांच्या जीवाशीखेळ सुरु आहे. ज्या एच.जी.इन्फ्रा कंपनी सोबत नातेगोते असल्या समान प्रशासकीय अधिकारी वागत होते. तेच अधिकारी पथदिव्यांच्या मागणीकरिता कंपनीपुढे लुळे पांगळे भासत आहे. पालकमंत्र्याच्या आढावा बैठकीत शहरात सॅनिटायझर फवारणी सुरु करा, असा आदेश सुद्धा थातुरमातुर सॅनिटायझर कार्यक्रम साजरा करुन नागरिकांची फसवणुक केली जात आहे.
त्यामुळे वरुड शहरातील मोकाट जनावरे पकडुन त्वरित विका किंवा जिल्ह्याबाहेर नेऊन सोडा, जनावर मालकीची माहिती मिळाल्यास त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करा. घरकुलाचे उर्वरित हप्ते त्वरित द्या, शहरातील विजय नगर, साई सृष्टी कॉलनी, गोविंद विहार परिसरात रस्ते व नाल्यांची व्यवस्था त्वरित करा, कोरोना महामारीच्या बचावाकरिता शहरात रोज नियमित निर्जंतुकीरण फवारणी करावी, रस्ता दुभाजकातील लावलेली रानटी झाडे काढुन फुलांची व कमी उंचीची, रस्ता व दुभाजकास मोठी झाल्यावर इजा न करणारी व विशेष म्हणजे जास्त प्रमाणात प्राणवायु देणारी झाडे लावण्यात यावी, शहरात नव्याने तयार रस्ता दुभाजकात त्वरित पथदिवे लावण्यात यावे, शहरातील एकमेव भव्य मैदान- मराठी शाळेच्या मैदानाची अवस्था डंपिंग यार्ड पेक्षाही वाईट करण्यात आली आहे, हे एकमेव मैदान जिथे वर्षभर विद्यार्थी खेळतात, त्या मैदानाची त्वरित दुरुस्ती करुन खेळण्याकरिता योग्य करावे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित जागी स्थापन करावा व त्वरित बांधकाम सुरु करण्यात यावे, जिल्हा परिषद अमरावती प्रमाणे नगरपालिका अंतर्गत सुद्धा दुर्धर रोग उपचार सहाय्यता मदत निधी योजना सुरु करावी, पाणीपुरवठा वेळापत्रक तयार करुन दिलेल्या वेळेतच करावे व मुबलक पाणीपुरवठा करावा, अशा मागण्या करीत आम्ही येत्या १४ सप्टेंबरपासुन न.प.मराठी शाळेच्या प्रांगणात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा नगरसेवक धनंजय बोकडे, मनोज देवते, मनोज भोपळे, महेश विरखरे, मंगेश सोनारे, राहुल गावंडे, विकास पांडे, रोशन आजनकर, कुनाल वानखडे, पुजेश्वर मानकर, सचिन दुधकवरे, अतुल पाटील, रजत बोरकर, मनोज खसारे, गनेश बरथे, कार्तिक चौधरी, बुद्धभुषन हरले, राधेश्याम चुरे, भुषण काळे, मनोहर भोयर, शुभम धारुळकर, गौरव राऊत आदींनी दिला आहे.

Related Articles

Back to top button