मराठी

मदतीसाठी मोदींची भेट घेणार

शरद पवार यांची माहिती; दुष्काळग्रस्त भागाला भेट

उस्मानाबाद दि १८: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उस्मानाबाद जिल्ह्यात अतिदृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आहे. तुळजापूरमध्ये पाहणी केल्यानंतर ‘येत्या दहा  दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. महाराष्ट्राला केंद्र सरकारने मदत करावी’, अशी मागणी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

परतीचा पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी पवार उस्मानाबादेत दाखल झाले आहे. शहरात दाखल झाल्यानंतर पवार यांनी लोहारा तालुक्यातील सास्तुर गावामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ‘शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येणार नाही, केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेऊन भरीव मदत करावी. राज्य सरकारला मदत करण्यासाठी मर्यादा आहेत’ असे शरद यांनी सांगितले. परतीच्या पावसामुळे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. या संकटाला खचून न जाता एका धीराने सामना करावा लागेल, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खासदारांच शिष्टमंडळ घेवून मोदी यांची  भेट घेणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

उस्मानाबादमध्ये त्यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी पवार यांना त्यांच्या व्यथा सांगितल्या. पाहणीच्या वेळी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. पवार हे उस्मानाबादेत येणार असल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हेलिपॅडजवळ एकच गर्दी केली होती. पवार आपल्या ताफ्याकडे जसे पुढे वळले तसा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एकच गराडा घातला.

कोरोनाच्या अनुषंगाने सर्वांना सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी सांगितले जाते आहे; मात्र हा नियम पवार यांच्या समोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पायदळी तुडवत होते. त्यामुळे खुद्द पवार यांनी कार्यकर्त्यांना सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी सांगू लागले; मात्र कार्यकर्ते पवार यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर सुरक्षारक्षक आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दूर केले.

  • आमदाराची सोनसाखळी चोरीला

या दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उमरगा-लोहाराचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौघुले यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरट्यांनी लांबवली. अज्ञात चोरट्यांनी आमदाराच्या सोनसाखळीवरच डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे.

Related Articles

Back to top button