वरुड/दि.८ – येथील ग्रामीण रुग्णालयातील हत्तीरोग विभागात कार्यरत असलेल्या आरोग्य सेवक खुशाल नागले यांचे आज अमरावती येथील रुग्णालयात सारीच्या आजाराने मृत्यु झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. खुशाल नागले यांच्या निधनामुळे आरोग्य अधिकारी आणि कर्मचा:यांमध्ये खळबळ माजली आहे.
शहरातील विजयनगर परिसरात वास्तव्यास असलेले तसेच वरुड ग्रामीण रुग्णालयातील हत्तीरोग विभागात गेल्या ८ वर्षापासुन कार्यरत असलेले आरोग्य सेवक खुशाल चिंदुजी नागले (५२) यांना अल्पशा आजारामुळे ४ ऑक्टोंबर रोजी अमरावती येथील पारसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज दुपारचे सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यांचेवर आज सायंकाळचे सुमारास वरुड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या मुत्युने वरूड ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी, कर्मचा:यांमध्ये चिंतेच्या वातावरणासह हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
अत्यंत सुस्वभावी आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणारे खुशाल नागले हे मुळचे तालुक्यातील काटी या गावचे रहिवाशी होते. त्यांच्या अचानक निधनामुळे वरुडसह काटी गावात सुध्दा हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या मृतदेहावर काटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.