मराठी
महामहिम राष्ट्रपतींना भेटुन म. कृ. स.राज्यपालांनी पाठवलेल्या शिफारसीचा पाठपुरावा करणार
राज्यातील मोठ्या संख्येने मतदार असलेल्या अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीच्या मुध्यावर खासदार नवनीत राणा यांचे नेतृत्वात राष्ट्रपती महोदयांचे लक्ष वेधनार
प्रतिनिधी अमरावती १७ – भारताचे महामहिम माननीय रामनाथजी कोविंद राष्ट्रपती यांना खासदार नवनीत रवी राणा यांचे माध्यमातून भेटुन त्यांना महाराष्ट्र राज्यातील कोळी महादेव , हलबा , ठाकुर , का ठाकूर , धोबा परीट , म्हल्लर कोळी , टोकरे कोळी , कोळी ढोर , धनगर , कोलाम , हलबा , हलबी,परधान , गोंड , वारली , छत्री , मन्हेवारलु, छत्री, इत्यादी अशा मोठ्या संख्येने महाराष्ट्र राज्यामध्ये मतदार असलेल्या अन्यायग्रस्त जमातीला त्यांचे घटनात्मक अधिकार असूनसुद्धा राज्य सरकार त्यांना आकसबुद्धीने सवलतीपासून वंचित ठेवत आहे. तर काही मुद्धावर केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना राज्य शासनाला अपेक्षित आहे यासाठी नुकत्याच मा.भगतसिंग कोश्यारी राज्यपाल महोदयांनच्या कडे झालेल्या बैठकीत शिष्टमंडळामध्ये वरील सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र राज्य मा. कृती. समितीचे महासचिव उमेश महादेवराव ढोणे,यांनी अधिकाऱ्यांनकडून सातत्याने होत असलेला अन्यायाचा पाढा राज्यपालांनकडे मांडला यांनंतर डॉक्टर महेंद्र काळे बिके हेडाऊ, सहारकर,ऍड ढोले यांनी आप आपले मत मांडले ,यावेळी राज्यपालांनी सर्व व्यथा ऐकून घेऊन सर्वांचे निवेदन स्वीकारून राज्य सरकारचे प्रमुखांना व काही मुद्धावर केंद्र सरकारच्याकडे शिफारस करण्यात येईल असे राज्यपाल महोदयांनी शिष्टमंडळाचे नेत्यांना त्यांनी सांगितले.
राज्यपालांनी केंद्रसरकारकडे पाठवलेल्या शिफारशी अनुषंगाने महामहिम आदरणीय राष्ट्रपती महोदयांनचे कडे आम्ही भेटून त्यांनाही महाराष्ट्र राज्य सरकार यांना निर्देशीत करण्यासाठी व काही मुद्धावर केंद्र सरकारच्या कडून न्यायोचित आदेश काढण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील खासदार नवनीत रवी राणा यांचे माध्यमातून वरील समाजाची नेतृत्व करणारी महाराष्ट्र राज्य कृती समिती ज्या मध्ये उमेश महादेवराव ढोणे, बि के हेडाऊ, शिवानंद सहारकार,ऍड ढोले, डॉक्टर महेंद्र काळे, गजानन सूर्यवंशी, राजेंद्र खैरनार, माणिकराव नेमाडे, विलासराव सोंनकुसरे,रघुनाथदादाजि खडसे, मिलींद अवघड, शंकर डोंगरे, पुरुषोत्तम खर्चाण, देवराम नंदणवार,दीपक केदार, पंकज रामेकर,आदी पदाधिकारी राज्यपालांनकडे बैठकीत होते तेचं दिल्लीला राष्ट्पती यांनाही भेटतील, म.कृ.स.ने तसे पत्र महामहिम माननीय राष्ट्रपती यांच्याकडे पाठवले असल्याचे. म.कृ. स.चे गजानन सूर्यवंशी यांनी सांगितले.