मराठी

‘एचआयव्ही’बाबत बाईक रॅलीद्वारे जनजागृती; असमानता नष्ट करण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांच्या हस्ते रॅली मार्गस्थ

अमरावती/दि१०- स्थानिक जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णालय अमरावती द्वारे जागतिक एड्स दिन २०२१ निमित्त जिल्हा भरामधे विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात आज जनजागृती बाइक रॅली जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे आयोजित करण्यात आली. या जनजागृती बाइक रॅलीला  जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी सर्वाना एचआयव्ही/एड्सबाबत शपथ देण्यात आली.सदर जनजागृती बाइक रॅलीला कोविड प्रतिबंधात्मक संसाधनांचा उपयोग करत जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय अमरावती येथून रेल्वे स्टेशन चौक ते राजापेठ ते राजकमल चौक ते कॉटन मार्केट ते शेगाव नाका चौक ते पंचवटी चौक ते सामान्य रुग्णालय अमरावती या मार्गावर जनजागृती बाइक रॅली द्वारे एचआयव्ही/एड्स बाबत जनजागृती करण्यात आली.जनसामान्य एचआयव्ही/एड्स संदर्भात अधिक संवेदनशिल असल्याने यावर्षी संपवूया भेदभाव, संपवूया एड्स, संपूया महामारी या घोषवाक्य द्वारे जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमास  जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांच्यासह डॉ.श्यामसूंदर निकम जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय, डॉक्टर प्रदीप नरवणे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय अमरावती, श्री. अजय साखरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डापकू विभाग सामान्य रुग्णालय, श्री. प्रकाश शेगोकर जिल्हा पर्यवेक्षक, डॉक्टर पदमाकर सोमवंशी डॉ.पंजाबराव देशमुख स्मृति वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. ज्योत्सना किटुकले, डॉ. गोविंद कासट, डॉ. मंदा नाणंदुरकर समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना, श्री. राजेश पीद्डी संत गाडगेबाबा अमरावती विध्यापीठ अमरावती, डॉक्टर मीनल देशमुख अध्यक्ष अमरावती स्त्रीरोग तधन्य संघटना, डॉक्टर शलाखा बारी सचिव स्त्रीरोग तधन्य संघटना अमरावती, डॉक्टर सुयोगा देशपांडे स्त्रीरोग तधन्य संघटना अमरावती, डॉक्टर प्रधन्या चौधरी स्त्रीरोग तधन्य संघटना अमरावती, डॉक्टर संदीप दानखडे सचिव आय. एम. ए. अमरावती, प्रा. डॉक्टर कुंदन पाटील शासकीय फार्मसी महाविध्यालय अमरावती, प्रा. गवई नर्सिंग कॉलेज अमरावती, डॉक्टर श्रीरंग ढोले, डॉक्टर प्रीती मोरे, डॉक्टर श्री. राजाभाऊ डांगे, श्री. प्रमोद मिसाळ, श्री. दामोदर गायकवाड, श्री. नरेश मंथापुरवार, श्री. लोकेश पवार, श्री. चंद्रकांत हिरोडे, श्री. अजय खेडकर, श्री. अमित बेलसरे, श्री. प्रवीण मिसाळ, श्री. अजय वरठे, श्री. अमोल मोरे, श्री. गजेंद्र बेलसरे, श्री. सचिन वानखडे, श्री. श्रीकांत गोहाड, श्री. संजीव वर्मा, श्री. प्रवीण पिंजरकर, श्री. विनोद हगवणे श्री. सुरज भोयर, श्री. किशोर पाथरे, श्री. सुनील अघम, श्री. विशाल बोंबे, श्री. अमोल राऊत, श्री. श्याम वाहने, श्री. आशीष अंधारे, श्री. संदीप पाटील, श्रीमती आरती इंगळे, श्रीमती नीता गोगटे, श्रीमती प्रीती आगरकर, श्रीमती सपना ठाकूर, श्री. गणेश पराते कार्यक्रम अधिकारी टेक्निकल सपोर्ट यूनिट आशासकीय संस्था, डॉक्टर रघुनाथ वाडेकर प्रकल्प संचालक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आरोग्य व शिक्षण प्रसारक मंडळ मोझरी, श्री. संत सत्ययदेव बाबा महिला मंडळ मोझरी, श्री. बी. एस. रामटेके प्रकल्प संचालक भाग्योदय बहुउदेशीय संस्था अमरावती, श्री. राजेंद्र साबळे प्रकल्प व्यवस्थापक, श्री. ब्रिजेश दळवी प्रकल्प व्यवस्थापक, श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, श्री. परमेश्वर मेशराम प्रकल्प व्यवस्थापक भाग्योदय बहुउदेशीय संस्था अमरावती तसेच सदर जनजागृती बाइक रॅलीला महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत कार्यरत डापकू, श्री. संत गाडगेबाबा अमरावती विध्यापीठ अमरावती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आरोग्य व शिक्षण प्रसारक मंडळ मोझरी, श्री. संत सत्ययदेव बाबा महिला मंडळ मोझरी, श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, भाग्योदय बहुउदेशीय संस्था अमरावती, विहान, आधार संस्था अमरावती, समर्पण ट्रस्ट संस्था, साथी प्रकल्प अमरावती, आय. एम. ए. अमरावती, स्त्रीरोग तधन्य संघटना अमरावती, जॉनटस क्लब अमरावती, शासकीय औषध निर्माण महाविद्यालय अमरावती व विविध महाविध्यालय कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी, प्राचार्य, डॉक्टर उपस्थित होते.

Back to top button