घरांची खरेदी वाढणार
मुंबई/दि. २ – अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी विकासाची गती लक्षात घेऊन अनेक ठळक आणि मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पात आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राची निराशा दूर करण्यासाठी सरकारनेमोठ्या घोषणा केल्या आहेत.
या अर्थसंकल्पात सरकारनेबिल्डर आणि ग्राहक या दोघांना दिलासा दिला आहे. विशेषत: परवडणार्या घरांसाठी कर्जावरील कराची सवलत वाढविण्यात आली आहे. परवडणार्या घरांचे प्रकल्प असलेल्या बांधकाम व्यावसायिकांना आणखी एक वर्षाची कर सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यातून आता घर खरेदीत तेजी येऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या वर्षी कोरोना विषाणूमुळेअर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रालाही त्रास सहन करावा लागला; परंतु टाळेबंदी मागे घेताच घरांच्या खरेदीत वाढ झाली. या क्षेत्रातील बिल्डर्सआणि व्यावसायिकांनी सरकारकडेसवलत देण्याची मागणी केली, जेणेकरून घरांची खरेदी कायम राहील. सरकारनेत्याची दखल घेतली.
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात घर खरेदीसाठी आणखी एक संधी दिली आहे. परवडणार्या घरांवरील कराची सूट पुढील एक वर्षासाठी वाढविण्यात आली आहे. याशिवाय भाड्याच्या घरांवरील करात सूटही वाढविण्यात आली आहे. परवडणार्या घरांसाठी गृह कर्जावरील दीड लाख रुपयांच्या अतिरिक्त करात सूट आहे. ही योजना 31 मार्च 2021 रोजी बंद होणार होती; परंतु कोरोना आणि टाळेबंदीमुळे सरकारनेया योजनेची अंतिम मुदत 31 मार्च2022 पर्यंत वाढविली आहे.