राष्ट्संत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा
यवतमाल दि ११ – शहरातील गुरुदेव युवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोज गेडाम यांनी राष्ट्संत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावेया मागणी करता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून लेखी निवेदन सादर केले होते. सदर निवेदन जिल्हाधिकारीकार्यालयामार्फत मुख्यमंत्री कार्यालयात पाठविण्यात आले होते. मनोज गेडाम यांनी स्वतः मुंबई येथे सचिवालयात भेट देवून त्यांनी दिलेल्या निवेदनावरकारवाई बाबत माहिती घेतली असता त्यांचे निवेदन केंद्र सरकार दिल्ली कडे पाठविण्याची माहिती त्यांना देण्यात आली. राष्ट्संतानी भारताच्यास्वातंत्र्य प्राप्तीकरिता भजन कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली व ब्रिटीश सरकार विरुद्ध त्यांनी केलेल्या जनजागृती करिता त्यांना कारावास हीभोगावा लागला. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर राष्ट्संतांनी व्यसनमुक्ती, ग्रामसुधार या करिता मोलाचे कार्य केलेले आहे. राष्ट्संतांनी लिहिलेली ग्रामगीताराज्याच्या व्यवस्थापनाकरिता मोलाचे मार्गदर्शक आहे.
अशा परिस्थितीत राष्ट्संतांना भारतरत्न देवून त्यांचा सन्मान ह्वावा हि मनोज गेडाम यांची मागणी रास्त असून वेळ पडल्यास आपल्या मागणी करितादिल्ली येथे जावून पाठपुरवठा करण्याचा मानस सुद्धा मनोज गेडाम यांनी व्यक्त केला. यावेळी प्रफुल मानकर समाधान रंगारी इत्यादी कार्यकर्ते उपस्थितहोते.