मराठी
मानवाधिकार दिवस संपन्न
अमरावति /दी १०-जागतीक मानवाधिकार प्रशासनाच्या वतीने आज दि. 10/12/2021 मानवाधिकार दिन प्रित्यर्थ जागतिक मानवाधिकार प्रशासनाचे मुख्य कार्यलय ८९ वृंदावन वसाहत साई नगर अमरावती येथे मानवाधिकार प्रशासनाचे अध्यक्ष श्री राजेंन्द्र येते, महिला अध्यक्ष सौ.आशा ताई येते, सचिव श्री कृष्णा पाचडे यांची प्रमुख उपस्थिती तसेच महाराष्ट्र राज्य प्रेस फाऊंडेशन अध्यक्ष्य सौ. अनिता कोकाटे, जिल्हा अध्यक्ष सौ. आरती पिंपळे, कार्यालयीन प्रवक्ता चिराग वासनकर , डॉक्टर फाऊंडेशन मानवाधिकार प्रशासन डॉ. काजल ढेवले, किचन फॅशन अध्यक्ष सौ. कल्पना चौधरी, मानवाधिकार प्रशासन प्रसिध्दी प्रमुख श्री प्रणव हाडे यांच्या विशेष उपस्थितीत मान्यवरांना वृक्ष (रोप) सस्नेह भेट म्हणून देण्यात आले व मान्यवरांचे भाषण, मार्गदर्शन जन राष्ट्राच्या रक्षणार्थ प्रेरणा, वचन बद्धता यावर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. *सर्वांनी जगा आणि संन्मानाने जगू द्या* हा संदेश दिला. कार्यक्रमाचे संचालन तुषार गडेकर यांनी केले.
मानवाधिकार प्रशासनाचे सदस्य – सौ. रति वासनकर, वर्षा भागडकर, सौ. प्रिया देवलसी, नवधा पिंपळे , श्रीमती अलका भागडकर, सौ.माधवी हाडे, श्री गौतम देशपांडे, रोहित राजुरकर अन्य उपस्थित होते.