मराठी

हाथरस दंगलीसाठी परदेशातून शंभर कोटी

सामूहिक बलात्कार करण्याचा दंगली घडविण्याचा होता कट

लखनऊ/दि. ७ – हाथरसातील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर दंगली घडविण्याचा कट रचल्याबद्दलल नवनीवन माहिती समोर येते आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या अतिरेकी संघटनेला उत्तर प्रदेशात वांशिक दंगली पसरवण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मिळाला होता, त्यातील 50 कोटी मॉरिशसमधून आले होते. पीएफआय ही तीच संस्था आहे, जिचे नाव सीएएविरोधात दिल्लीत झालेल्या दंगलीतही आले होते.
मंगळवारी रात्री दिल्लीहून हाथरसकडे जाणा-या चार कार्यकर्त्यांना मथुरामध्ये अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे 6 स्मार्टफोन, एक लॅपटॉप, ‘जस्टिस फॉर हाथरस विक्टिम’ आणि अॅेमपलेट आदी साहित्य आढळले आहे. स्थानिक न्यायालयाने चारही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या चारही आरोपींचा वेबसाइट जस्टीसशी संबंध आहे. काहीजण कार्डेकॉब वेबसाइटच्या माध्यमातून निधी जमा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही समजते. गर्दी जमवणे, अफवा पसरवणे, निधी उभारणे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली संघटना आणि त्यांच्याशी संबंधित संघटना देशविरोधी काम करत आहेत. जातीय वैर वाढविणे आणि समाजात अस्थिरता निर्माण करून दंगली घडविणे हे या वेबसाइटचे लक्ष्य आहे. दंगलीदरम्यान त्यांची ओळख कशी लपवायची आणि वातावरण खराब कसे करावे हे या वेबसाईटच्या माध्यमातून सांगितले जाते.
हे प्लॅटफॉर्म कोणी आणि कोणत्या हेतूने तयार केले, याची आता पोलिस चौकशी करतील. या वेबसाइट्सवरून आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहेत, कोठे जमा झालेला निधी वापरला गेला आणि कोणाच्या खात्यात पैसे पाठवले गेले, याची पोलिस चाैकशी करणार आहेत.  ईडी अवैध निधीसंदर्भात मनी लाँडरिंग अँगलचीही प्राथमिक चौकशी करीत आहे.

Related Articles

Back to top button