मराठी

खासदार भावनाताईंच्या उपस्थितीत शेकडो तरुणांचा शिवसेना प्रवेश

व्यापारी तसेच कुशल कामगारांनी बांधले शिवबंधन, शिवसेनेत उत्साह

यवतमाळ/दि.४  –  शहराच्या लोहारा, मोहा, पिंपळगाव तसेच इतर भागातील शेकडो तरुणांनी खासदार भावनाताई गवळी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला. विशेष म्हणजे व्यापारी तसेच कुशल कामगारांनी सुध्दा आपल्या हाताला शिवबंधन बांधून समाजकारणात उडी घेतली आहे. सतत सुरु असलेल्या शिवसेना प्रवेशाने शिवसैनिक तसेच पदाधिका-यांमध्ये उत्साह संचारला आहे.
शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि फक्त गरज पडल्यास वीस टक्के राजकारण करते. त्यामुळेच शहरातील तरुणांचा शिवसेना हा पक्ष आकर्षण बनला आहे. सातत्याने शहरातील तरुण शिवसेनेत प्रवेश घेत आहे. नुकताच खासदार भावनाताई गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील तरुण, व्यापारी, कामगारांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. या प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे यवतमाळ शहर प्रमुख पिंटु बांगर यांनी केले. खासदार भावनाताई गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रवेश घेणा-या तरुणांच्या हाताला शिवबंधन बांधण्यात आले. याप्रसंगी प्रवेश घेणा-या तरुणांनी आपण नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगीतले. पिंपळगाव भागातील मोहसिन शेख, यासीन शेख, महेन्द्र लुटे, राधेशाम मादनकर, अक्षय उईके, आकाश कोटनाके, उज्वल तिडके, सुरेश कोहळे, सुरज मिसाळ, सुरज जाधव, सागर परनाके, रुषीकेश पवार, तिखील जांभोरे, शुभम पेंदोकर, अक्षय चव्हाण, संतोष मुंढरे, सलमान शेख, वैभव अंगाईतकर, खुशाल मढवे, मंगेश पिंपळकर, विजय ढोके, कृष्णा शहागडे, सैफ खान, मैथीली नगर भागातील रवि बनकर, पंकज बनकर, निखील पुरी, दिपक ढोने, शुभम ओटे, आकाश रामटेके, प्रशीक इंगोले, मुकेश अंबोरे, सागर उपाधे, अंकीत डांगे, गिरीष गेडाम यांनी प्रवेश घेतला. याव्यतिरीक्त शहरातील पुरुषोत्तम शिंदे, राजु आडे, विकास दांडेकर, फिरोज खान, कपील राहेजा, आशिष तिंडाने, रविन्द्र जाधव, मनोज लेंडे, जय अलवानी, चेतन भुसारी, विलास चरवरकर, प्रदीप कोरे, रवि चव्हाण, चानेश्वर गन्हाडे, शुभम तपकार, अजु धवले, प्रकाश खटवाणी, मनीष बांगर, प्रविण भुमर, महावीर स्वामी, जुबेर खान, वासू लोखंडे, संजु फतवाणी, देवीदास आंबेकर, सचिन बत्रा, गोलु खान, मोरेश्वर जाधव, आमीर खान, आवेश खान, अजहर सोलंकी यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.

शिवसेना आनखी प्रबळ करणार

शिवसेनेच्या सामाजिक कार्यामुळे प्रामुख्याने तरुणांचे आकर्षण वाढले असून ते शिवसेनेत प्रवेश घेत आहे. यवतमाळ जिल्हयात शिवसेना आनखी प्रबळ करण्याचे आमचे ध्येय आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्याच्या प्रत्तेक भागात शिवसेनेच्या शाखा काढण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहे.

 

Related Articles

Back to top button