मराठी

मी शांत आहे म्हणून संत नाही माझ्या शांत पणाचा फायदा अधिकाऱ्यांनी घेऊ नये

- आमदार देवेंद्र भुयार 

  • आमदार देवेंद्र भुयार यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर

  • मोर्शी वरुड तालुक्यातील सिंगल फेज लाईन, ८५ ट्रान्सफार्मर तात्काळ सुरू करण्याचे दिले निर्देश

वरुड/दि.११ – आमदार देवेन्द्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील  शेतकऱ्यांच्या समस्या तक्रारी तात्काळ सोडविण्याकरिता महावितरण अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
 महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वरुड मोर्शी तालुक्यामध्ये १६ केव्हीचे २५ ट्रान्सफार्मर, ६३ केव्हीचे २० ट्रान्सफार्मर, १०० केव्हीचे ४० ट्रान्सफार्मर, असे एकून ८५ नादुरुस्त ट्रान्सफार्मर बंद अवस्थेत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी अधीक्षक अभियंता अमरावती मंडळ यांच्यासह महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले नादुरुस्त असलेले ८५ ट्रान्सफार्मर,  मोर्शी वरुड तालुक्यातील सर्वच फिडरवरील रात्रीला सिंगल फेज वीज पुरवठा २५ आक्टोबर पर्यंत सुरू करण्याचे निर्देश दिले व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व त्यांच्या वेळ काढू धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरून झालेल्या नुकसानाची भरपाई वसूल करण्यात येईल व त्यांच्यावर कार्यवाही केल्या जाईल असा इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी महावितरण अधिकाऱ्यांना यावेळी दिला.
       मोर्शी वरुड तालुक्यात सोलर प्रकल्प उभारण्याकरिता लागणाऱ्या जागेकरिता महसूल विभागाशी समन्वय साधून भूसंपदानाचे काम मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले. मोर्शी वरुड तालुक्यातील ना दुरुस्त असलेले ८५ ट्रान्सफार्मर लावण्याचे काम १४ आक्टोबर पर्यंत पूर्ण करून वरुड मोर्शी तालुक्यातील सर्व फिडरवरील सिंगल फेज लाईन रात्री सुरू करण्याचे काम २५ आक्टोबर पर्यंत पूर्ण करून आऊट सोर्सिंग पद्धतीने वायरमन तसेच ऑपरेटर पुरवण्याचे कंत्राट काढणे, लोकांच्या घरावरून गेलेल्या विजलाईन काढणे, शेतकऱ्यांनी वीज घेण्यासाठी केलेले अर्ज लवकर मंजूर करणे, संत्रा झाडे जळणे, जनावरे दगावणे अश्या प्रकारच्या नुकसानीचा तात्काळ मोबदला मिळणे यासह विविध विषयांवर आढावा घेण्यात आला त्यावेळी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेन्द्र भुयार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी,  युवा जिल्हाप्रमुख स्वाभिमानी शेतकरी संघटना ऋषिकेश राऊत , मोर्शी वरुड तालुका संपर्क प्रमुख संदीप खडसे, अधीक्षक अभियंता संजय खाणंदे, मोर्शी येथील कार्यकारी अभियंता धर्मेंद्र मानकर, उपकार्यकरी विनोद काळे, उपकार्यकारी अभियंता राजेश दाभाडे, उपकार्यकारी अभियंता संजय दातीर, उपकार्यकारी अभियंता कानडे, उपकार्यकारी अभियंता बारइ, मनीष धोटे, कृष्णा सोनारे, आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
महावितरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील ८५ ट्रान्स्फफार्मर नादुरुस्त  नवीन डीपी बसविन्याचे काम १४ आक्टोबर पर्यंत पूर्ण करून वरुड मोर्शी तालुक्यातील सर्वच फिडरवरील शेतातील सिंग फेज २५ आक्टोबर पर्यंत सुरू करण्याचे निर्देश दिले असून या कामामध्ये हयगय खपवून घेतली जाणार नसून मी शांत आहे म्हणून संत नाही माझ्या शांत पनाचा फायदा अधिकाऱ्यांनी घेऊ नये अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील – आमदार  देवेंद्र भुयार

Related Articles

Back to top button