मराठी

ऐकत नसतील तर घाला दंगा

कांग्रेस मंत्री यशोमति ठाकूर यांचे विधान,विरोधकांनी लगावला टोला

मुंबई/दि-९ – काँग्रेस मंत्री यशोमती ठाकूर यांनी अधिकारी ऐकत नसतील तर दंगा घाला हे स्पष्ट विधान केले आहे. त्यावर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. सोलापूरात कार्यकर्तानां यशोमति ठाकूर ने तुमची कामे होत नसतील तर दंगा घाला. बिल्कुल दंगा करा. भीक मागितली तर कोणी देत नाही. आपला अधिकार आहे, हिसकावून घ्या. आम्ही येऊन तालुका सांभाळायचा तर तुम्ही काय सांभाळायचे असा अजब सल्ला दिला आहे.
मात्र या सल्ल्यावरुन भाजपाने ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेस मंत्र्याना सवाल विचारला आहे. यात म्हटलं आहे की, कामं होत नसतील तर दंगा करा, मंत्री यशोमती ठाकूर यांचा कार्यकर्त्यांना सल्ला तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात म्हणतात, कार्यकर्त्यांनी धाक निर्माण करण्यासाठी समूहाने शासकीय कार्यालयात जावे. महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच टगेगिरी हीच महाभकास आघाडीतील मित्र पक्षांची संस्कृती असल्याचा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला आहे.सोलापूरच्या जिल्हा नियोजन भवनमध्ये शनिवारी कोरोना विषाणूच्या आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात सोलापुरात आले होते. या दरम्यान सोलापूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठकही घेण्यात आली. यावेळी ठाकूर बोलत होत्या. कोणत्याही तालुकाध्यक्षाने तक्रार करू नये. तुम्ही तुमचा तालुका सांभाळायला पाहिजे. तुम्ही सांभाळा, तुम्हाला ताकद देण्याचे काम आम्ही करू, असे वक्तव्य ठाकूर यांनी केले. यानंतर बाळासाहेब थोरातांनी सांगितले की, अधिकाऱ्यांवर आपलाही धाक असायला हवा. जनतेचा प्रशासनावर धाक हवा. कार्यकर्त्यांनी दोन चार पोरं सोबत घ्या असे वक्तव्य केलं होतं.

Back to top button