मराठी

कोरोनावगळता इतर आजारांवरील उपचाराकडे दुर्लक्ष

रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार

मुंबई/दि.२५ – कोरोनाचा काळ इतर आजारांच्या रुग्णांसाठी मोठ्या अ डचणीचा ठरत आहे. देशातील पाच राज्यांतील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांत गेल्या आठ महिन्यांपासून 60 टक्के रुग्ण कमी झाले आहेत. तातडीचे उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांना मुश्किलीने दाखल करून घेतले जात आहे. रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी टाळेबंदीच्या आधीच्या तुलनेत दुप्पट वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
दिल्ली, महाराष्ट्र, हरयाणा, गुजरात आणि बिहार या पाच राज्यांतील सर्वांत मोठ्या सरकारी रुग्णालयांचे बाह्यउपचार कक्ष पूर्णपणे सुरू नाहीत. रुग्णांची संख्या सामान्य दिवसांच्या तुलनेत 20 टक्क्यांपर्यंतच आहे. कोरोनामुळे गंभीर आजार असलेले रुग्ण जास्त त्रस्त आहेत. अहमदाबादच्या सामान्य रुग्णालयाचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये झाल्याने लोक संसर्गाच्या भीतीने तेथे उपचार करवून घेत नाहीत. दिल्लीतील एम्समध्ये कोरोनापूर्वी ओपीडीत रोज 10-12 हजार रुग्ण येत होते. आता ही संख्या दोन-तीन हजारांवर आली आहे. तेथे शस्त्रक्रियेसाठी इमर्जन्सीत रोज 1200 रुग्ण येतात. आता गरजेनुसारच शस्त्रक्रिया होतात. पुणे येथील ससून या सरकारी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितले, की टाळेबंदीधी कमी जोखमीच्या 140 शस्त्रक्रिया रोज होत होत्या; पण आता फक्त 100 च होतात. ओपीडीतही रुग्णांची संख्या 2200 वरून 1400 वर आली आहे.
हरयाणात रोहतक पीजीआयएमएसमध्ये तीन दिवसांआधीच इलेक्टिव्ह सर्जरी बंद करण्याचे आदेश जारी झाले आहेत. तेथे पूर्वीच्या 10 हजार रुग्णांच्या तुलनेत सध्या तीन हजार रुग्णच येत आहेत.गुजरातमध्ये सर्वांत मोठ्या सरकारी रुग्णालयातील कॅन्सर हॉस्पिटलचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये झाले आहे. तेथे कॅन्सरच्या शंभरपेक्षा जास्त रुग्णांची शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे. ओपीडीत 400 ते 800 रुग्ण येत असत. आता ते नगण्य आहेत. बिहारमध्ये पाटणा येथील एम्स कोविडसाठी राखीव केले आहे. इतर सरकारी रुग्णालयांत शस्त्रक्रिया, ओपीडी सुरू आहेत.

Related Articles

Back to top button