मराठी
मैत्रेय ग्रुपमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांना त्वरित रक्कम परत द्या – गुरुदेव युवा संघाची मागणी
आर्थिक गुन्हे शाखेने मैत्रीचा तपास गुंडाळला
यवतमाल दि ४ – गुंतवणूकदारांना चारपट परताव्याचे आमिष दाखवून मैत्रेय ग्रुप कंपनीने यवतमाळ जिल्ह्यातील अनेक नागरिकांना गंडविले, यवतमाळ जिल्ह्यातील मैत्री ग्रुप कंपनीची मालमत्ता पोलीस प्रशासनाने जप्त केली आहे, मात्र फसवणूक झालेल्यांना त्वरित रोख रक्कम मिळावी याकरिता गुरुदेव संघाच्या वतीने एम देवेंद्र सिंह जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले, यवतमाळ पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत फसवणूक झालेल्या नागरिकांचे अर्ज धूळखात असून आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसातच मैत्रेय कंपनीने केलेल्या फसवणुकीचा तपास गुंडाळला असल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे
मैत्री ग्रुप कंपनी ने लाखो गुंतवणूकदारांना गंडा घातला असून यवतमाळ जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये मैत्रेय कंपनीविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत, 2006 मध्ये यवतमाळ शहरात मैत्रेय ग्रुप ने फसवणुकीचे प्रकार सुरू केले आणि 2016 मध्ये मैत्री कंपनी यवतमाळ जिल्ह्यातील अनेक नागरिकांना गंडा घालून पसार झाली, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलिसात धाव घेतली, मैत्रेय ग्रुप ने केलेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे आला फसवणूक झालेल्या नागरिकांचे एक लाख तीस हजार अर्ज आर्थिक गुन्हे शाखेत धूळखात आहे मात्र काही दिवसातच आर्थिक गुन्हे शाखेने तपास गुंडाळला असल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे
पोलिस प्रशासनाने जप्त केलेल्या मैत्रेयच्या मालमत्तेची विक्री करून आर्थिक पासून फसवणूक झालेल्या नागरिकांना पैसे परत द्या या मागणीचे निवेदन गुरुदेव संघाच्या वतीने जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांना देण्यात आले,येत्या 10 तारखेला गुरुदेव संघाच्यावतीने पोलीस अधीक्षक कार्यालय धडक मोर्चा नेण्यात येणार असल्याचे गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी सांगितले आहे
ज्या ठेवीदारांनी अद्याप फसवणुकीची तक्रार दाखल केली नाही त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करून गुरुदेव युवा संघाशी संपर्क करावा
मनोज गेडाम
अध्यक्ष
गुरुदेव युवा संघ