मराठी
अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तात्काळ बस सेवा सुरू करा.
अन्यथा प्रहार विद्यार्थी संघटनेचा आंदोलनाचा इशारा.
-
प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने विभागीय नियंत्रक म.रा.परिवहन मंडळ अमरावती यांना निवेदन
अमरावती दि २८ – कोरोना लॉकडाउन मोठ्या कालावधीनंतर शासकीय नियमांचे पालन करत राज्य शासनाने शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या अनुषंगाने खेड्या-पाड्यातील विद्यार्थ्यांची तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी शाळेत येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ग्रामीण भागातील बस सेवा सुरु नसल्याने विद्यार्थ्यांना खुप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.ग्रामीण भागातील बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. खाजगी वाहनधारक विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत आहेत. त्यामुळे आपण लवकरात लवकर अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बस सेवा सुरु कराव्यात अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदन देताना जिल्हाप्रमुख छोटु महाराज वसु,प्रहार विद्यार्थी संघटना जिल्हाप्रमुख आकाश खारोडे, अंकुश कळसकर, विवेक बांबल, कुलदीप बोबळे,पंकज सुरडकर,सर्वेश पिंपराळे, भुषण पोहोकार,नितीन लाडविकर, हर्षद बेटेकर,गोलु ठाकुर, गजानन सावरकर,सागर देउळकर, प्रफुल्ल चाहाकार, नितीन शिरभाते, राजेश पळसपगार व समस्त प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.