मराठी

ग्रामीन भागातील धनगर समाजासाठी घरकुल योजनांची अंमलबजावणी करा

खासदार भावनाताई गवळी यांचे निर्देश

प्रतिनिधी यवतमाळ दि ११ :-ग्रामीन भागातील भटक्या जमातीच्या क प्रवर्गातील धनगर समाजाचे अनेक नागरीक घरकुल योजनेपासून वंचित आहे. या संदर्भात धनगर समाजातील अनेक नागरीकांनी शासनाच्या
घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहे. दरम्यान या तक्रारीच्या 
आधारावर खासदार भावनाताई गवळी यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश देऊन 
धनगर समाजाच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देण्याचे निर्देश दिले आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर  राज्याच्या  ग्रामीण भागातील धनगर समाजातील लोकांसाठी घरकुल
योजने अंतर्गत पहिल्या टप्यात दहा हजार घरकुल बांधून देण्याचा निर्णय राज्य सरकारने  घेतला आहे. 
शासनाच्या या निर्णयाचा लाभ भटक्या जमाती प्रवर्गातील ग्रामीण भागातील धनगर समाजाला मिळणे
गरजेचे आहे. त्यामुळे या योजनेला गती देऊन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश
खासदार भावनाताई गवळी यांनी दिले आहे. घरकुल योजनेची  गावपातळीवर प्रभावीपणे 
अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी अशा सुचना त्यांनी जिल्हा 
प्रशासनाला दिल्या आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार भटक्या 
जमाती प्रवर्गातील ग्रामीण भागातील धनगर समाजाच्या लोकांसाठी दहा हजार घरकुल अंदाजित
खर्च 150 कोटी  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरकुल योजनेसाठी आवश्यक असलेल्या या 
खर्चास शासनाने  30. जुर्ले  2019 रोजी मान्यता दिली आहे.  सदर योजना यशस्वीपणे  राबविण्यासाठी
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. या समितीला प्रशासकीय 
मान्यता देण्याचे अधिकार  राहणार आहे. निधी वितरणासाठी  प्रथमता प्रशासकीय मान्यतेच्या 
आदेशासह शासनास प्रस्ताव पाठवावा लागणार असून त्यानुसार  शासन निधी वितरण करणार आहे.
शासकीय प्रक्रिया लवकर पुर्ण केल्यास लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ सुध्दा लवकर मिळणार असल्याने 
जिल्हा प्रशासनाने या संदर्भात योजनेला गती देण्याचे निर्देश खासदार भावनाताई गवळी यांनी दिले आहे. 

धनगर समाजाला मिळेल दिलासा
अनुसूचित जाती, जमाती प्रमाणेच धनगर समाजात सुध्दा मोठया प्रमाणात नागरीक हलाखीचे जीवन जगत आहे. 
राज्यातील लाखो धनगर समाजातील नागरीकांजवळ स्वताचे पक्के घर सुध्दा नाही. त्यामुळे 
सरकारने तयार केलेली ही योजना धनगर समाजातील नागरीकांसाठी उपयोगाची 
ठरणार असून राज्यातील लाखो धनगर बांधवांना दिलासा देणारी आहे. त्यामुळे या योजनेला 
गती देण्याचे निर्देश मी जिल्हा प्रशासनाला दिले आहे

Related Articles

Back to top button