भारतीय महिला युनोत मोठया पदावर
मुंबई/दि. २६ – लिजिया नोरन्हा यांना युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP) च्या न्यूयॉर्क कार्यालयाच्या प्रमुखपदी नियुक्त केले गेले आहे. लिजिया यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे, तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पीएचडी केली आहे.
सातत्यपूर्ण विकासाच्या क्षेत्रात त्यांचा सुमारे 30 वर्षांचा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. त्या भारतीय अर्थशास्त्रज्ञ सत्य त्रिपाठीची जागा घेतील. संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सत्य त्रिपाठी यांचे नेतृत्व आणि समर्पित सेवा दिल्याबद्दल त्यांचेआभार मानले आहेत. 2014 पासून, नोरोन्हा नैरोबीमधील यूएनईपीच्या इकॉनॉमी शाखेत संचालक म्हणून काम करत आहेत. त्यांनी हरित आणि समावेशक अर्थव्यवस्था, उपभोग आणि उत्पादन, व्यापार आणि सातत्यपूर्णआर्थिक प्रणालींना प्रोत्साहन देण्याच्या क्षेत्रात कार्य केले आहे. युएनईपीमध्येप्रवेश घेण्यापूर्वी लिजिया यांनी द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट (TEII), नवी दिल्ली येथे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले. याव्यतिरिक्त, त्यांनी संसाधने, नियमन आणि जागतिक सुरक्षा शाखा संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. गेल्या आठवड्यात, गुटरस यांनी उषा राव-मोनारी या अग्रणी गुंतवणूक व्यावसायिकांची नेमणूक केली आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) चे अवर-सरचिटणीस आणि संयुक्त प्रशासक म्हणून नियुक्त केले.