मराठी

देशाची लोकशाही बळकट करण्याकरीता तरुणांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा

वर्धा, दि 25 :- भारत हा तरुणाचा देश म्हणुन ओळखला जातो.  आपल्या देशात 18 ते 25 वयोगटातील  70 टक्के  तरुण नवमतदार आहे.   या तरुणाच्या हाती देश घडविण्याची ताकद आहे. ही ताकद आजच्या तरुण मतदारांनी प्रत्येक निवडणूकीत मतदान करुन वापरावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आज राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात केले. आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे  कोरानाच्या पार्श्वभूमिवर  साधेपणाने  राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे, उपविभागीय अधिकारी  सुरेश बगळे,  उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे उपस्थित होते. आजच्या नवमतदारांनी मतदार यादीमध्ये  केवळ नाव नोंदवून चालणार नाही तर मतदान करणे  तेवढेच आवश्यक आहे.  स्वातंत्र्य काळात वर्धा जिल्हयाचे मोठे योगदान लाभले आहे. त्याच प्रमाणे येणा-या कोणत्याही निवडणूकीत  जिल्हयाची मतदानाची टक्केवारी  100 टक्के करावी अशी अपेक्षा यावेळी श्री भिमनवार यांनी व्यक्त  केली. देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी  प्रत्येक मतदाराने मतदान करावे असेही आवाहन त्यांनी केले. निवडणूक हा भारताचा अविभाज्य अंग आहे.  समाज बळकटी करणासाठी   मतदारांनी  मतदानाच्या प्रक्रियेत   सहभाग नोंदवून  लोकशाहीत मतदार राजा असलेला मतदानाचा हक्क  दाखवावा असे निशांत परमा म्हणाले. यावेळी मतदान करण्याविषयी उपस्थितांना  शपथ देण्यात आली. जिल्हयातील 520 ग्राम पंचायती, मतदान केंद्रावरुन तसेच 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळांमधून फेसबुक लाईव्ह व्दारे तर  नेहरु युवा केंद्रा व्दारे कलापथकाच्या माध्यमातून  मतदान प्रक्रियेसंबधी  जनजागृती  करण्यात आली. कार्यक्रमाला तहसिलदार स्वप्नील दिंगलवार, नायब तहसिलदार श्रीमती संध्या येणारे, श्री. पुंडलीक, श्री. वनकर , जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button