राजस्थानमध्ये पेट्रोल शंभर रुपयांजवळ
मुंबई/दि.२३ – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ थांबण्याचेनाव घ्यायला तयार नाही. शनिवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दुसर्या दिवशी वाढ केली. त्यामुळे राजस्थानमधील पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या जवळ पोहोचलेआहेत. भोपाळमध्ये पेट्रोल 93.56 रुपयेआणि मुंबईत 92.28 रुपयेप्रतिलिटर विकलेजात आहे.
23 जानेवारीला दिल्लीत पेट्रोल 85.70 रुपयेआणि डिझेल 75.88 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले. डिझेलच्या दरात 26 पैशांची वाढ झाली आहे तर पेट्रोलच्या दरात 25 पैशांनी वाढ झाली आहे. यापूर्वी शुक्रवारीदेखील डिझेल-पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली होती. राजस्थानच्या गंगानगर भागात पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.50 रुपयांवर पोचली आहे. डिझेलची किंमत प्रतिलिटर 88.91 रुपयांवर पोहचली आहे. जयपूरमधील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 93.20 रुपयेझाली आहे. पेट्रोलचे दर अशाच प्रकारे वाढत राहिले तर लवकरच तेप्रतिलिटर शंभर रुपयांचा आकडा गाठतील. जानेवारीत आतापर्यंत पेट्रोल 1.99 आणि डिझेल 2.01 रुपयांनी महाग झाले.
जानेवारीत आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्येआठ वेळा वाढ झाली. दिल्लीत पेट्रोल 1.99 रुपये प्रतिलिटरने महागले आहे. दुसरीकडे डिझेलबद्दल बोलायचे झाले, तर या महिन्यापर्यंत त्याची किंमत प्रतिलिटर 2.01 रुपयांनी वाढली आहे. सात डिसेंबर रोजी दिल्लीतील पेट्रोलची किंमत 83.71 रुपये आणि डिझेलची किंमत 73.87 रुपये प्रतिलिटर होती. यानंतर, 29 दिवस त्यांच्या किंमती वाढल्या नाहीत. या महिन्यात प्रथमच सहा जानेवारी रोजी किंमती वाढवण्यात आल्या.